मृत्यापासून सुटिजे काेणे। मागे पुढे विश्वास जाणे मृत्युपंथे ।।2।।

12 Dec 2022 14:16:10
 
 
 

Saint 
अश्वदलाचा मालक, हत्तींचा पालक किंवा प्रजापालक राजा, राजकारणी नेता, वतनदार, व्यापारी, व्यावसायिक किंवा एखादा गुंडपुंड या साऱ्यांनाच मृत्यू येतच असताे. मृत्यूसमाेर विद्वान आणि अडाणी, शास्त्री आणि अग्निहाेत्री, धूर्त आणि बहुश्रूत, वैदिक आणि पुराणिक, शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, गायक, नर्तक व वादक यांच्यात काहीही भेदभाव नाही. गाेसावी, तपस्वी, साधक, सिद्ध, पुरुष आणि स्त्री, बालक आणि वृद्ध, विद्यासंपन्न आणि द्रव्यसंपन्न, लेखक आणि कवी, याेगी आणि हठयाेगी या सर्वांच्या जीवनात माेठा फरक असला तरी सर्वांना नेणारा मृत्यूच असताे.संत आणि महंत, कुरुप आणि साैंदर्यवान, जटाधारी आणि निराहारी, या सर्वांची गणना मृत्यूच्या लेखी एकच आहे.
 
येथे श्रीसमर्थांनी दिलेली अनेकविध उदाहरणे त्यांचा मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचा किती अभ्यास हाेता याची द्याेतक असून ती पाहिल्यावर त्यांच्या ठायी नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रत्येक क्षेत्रातील माणसामध्ये मृत्यू फरक करीत नाही आणि सर्वांनाच मृत्युपंथे जावे लागते. त्याच्यापासून काेणाचीही सुटका नाही हे सांगताना ते म्हणतात, आता असाे हे बाेलणेें। मृत्यूपासून सुटिजे काेणे। मागे पुढे विश्वास जाणे। मृत्युपंथे।।36।। अखिल विश्वातील प्रत्येकाला आज ना उद्या मृत्युपंथानेच जावे लागणार आहे. म्हणूनच तेथपर्यंतचे जे जीवन आपणास मिळाले आहे ते सत्कारणी लावणे यातच आयुष्याच्या साफल्याचे रहस्य आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0