जगात पाळीव मांजरांची संख्या 60 काेटींपेक्षा जास्त

    12-Dec-2022
Total Views |
 

Cat 
 
जास्त काळजी घेतल्यास मांजर तुमची पर्वा करत नाही जगात अनेक लाेकांना पशु-पक्षी पाळण्याचा छंद असताे. त्यात कुत्रा व मांजरांची संख्या जास्त असते. काही लाेक पाेपट, कबुतर हे पक्षीही पाळतात. मांजरी पाळण्याची सुरुवात 12000 वर्षांपूर्वी झाली असे मानण्यात येते. जगात पाळीव मांजरांची संख्या 60 काेटींपेक्षा जासत आहे.मांजर तुमच्या मेंदुवर नियंत्रण ठेवू शकते.हे प्राणीशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. तुम्ही मांजरीची खूप काळजी घेत असाल, परंतु मांजर तुमची पर्वा करीत नाही. जपानमधील टाेकियाे विद्यापीठाने केलेल्या पाहणीचा हा निष्कर्ष आहे. मांजर तुमचा आवाज त्वरित ओळखते. परंतु अशा मांजरींची संख्या फ्नत 10% आहे.
 
मांजरीने तुमचा आवाज ओळखला की ती शेपूट हलविते व तुमच्या पायाजवळ घुटमळते व म्यांऊ- म्यांऊ असा आवाज काढत तुमच्या भाेवती फिरते. बहुतेक मांजरी आवाज ओळखूनही प्रतिसाद देत नाहीत. मांजरीला भूक लागली की ती सतत म्यांऊ म्यांऊ असा आवाज काढत तुमच्या भाेवती फिरते. ससे्नस विद्यापीठाचे पशुतज्ज्ञ कॅरेन ह्यूम राेज सकाळी मांजरीच्या विचित्र आवाजाने झाेपेतून जागे हाेत असत. त्यामुळे त्यांनी मांजरीच्या आवाजावर सखाेल संशाेधन केले. असता त्यांना असे आढळून आले की मांजर दाेन फ्र्निवेन्सीमध्ये आवाज काढू शकते. एक स्लाे तर दुसरी हाय फ्र्निवेन्सी असते हाय फ्र्निवेन्सीचा आवाज 380 हर्टज असू शकताे. तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज इत्नयाच फ्र्निवेनसींचा असताे.