एमएमआर क्षेत्रात ‘आपला दवाखाना’ सुरू करणार

01 Dec 2022 14:10:18
 
 

Hospital 
मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून, रस्ते, चाैक, पदपथ, वाहतूक बेटे, उड्डाणपुलांचे सुशाेभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ पुढच्या टप्प्यात सुरू हाेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशाेभीकरण, आराेग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी मुंबई फर्स्टचे नरिंदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेविल मेहता, अश्वनिी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
 
काेळीवाड्यांचे सुशाेभीकरण केले जात असून, त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने काेळीवाड्यांचा विकास केला जात असून, तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना हाेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत 227 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, त्या माध्यमातून सामान्यांना माेफत आराेग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काैतुक केले.
 
Powered By Sangraha 9.0