अश्नतपणा दूर करण्यासाठी आहार कसा असावा?

01 Dec 2022 14:27:58
 
 

Health 
 
ताज्या सफरचंदाचे बारीक तुकडे करून त्यातील बीया काढून टाकाव्यात.नंतर एका स्वच्छ काेरड्या, माेठ्या ताेंडाच्या काचेच्या बरणीत हे तुकडे घालून त्यात सफरचंदाच्या वजनाइतका नवीन मध घालून हे मिश्रण लाकडी चमच्याने ढवळावे आणि त्यात केशर, वेलची पावडर घालावी व घट्ट झाकण लावावे.दरराेज ही काचेची बरणी 2 तास उन्हात ठेवावी व राेज मिश्रण काेरड्या लाकडी चमच्याने ढवळावे. चाळीस दिवस ही प्रक्रिया केल्यावर हे मिश्रण राेज 2 चमचे 2 वेळा दुधाबराेबर घ्यावे.या मिश्रणाने अश्नतपणा त्वरित जाऊन लवकर ताकद येते.अशक्तपणा दूर करण्यासाठी पुढील उपचार करता येतील.
 
 साजूक तुपामध्ये खारीक, बदाम, डिंक, साखर यांची पावडर घालून मिश्रण करावे. दरराेज 1 चमचा 2 वेळा घ्यावे.
 आहाळीवाची खीर करावी व त्यात डिंक, बदाम, खडीसाखर, खारीक यांचे चूर्ण घालून ती पिण्यास द्यावी.
 खसखशीची खीर करून त्यात खारीक, बदाम, खडीसाखर यांचे चूर्ण घालून ती पिण्यास द्यावी.
 पथ्य - पचेल असा आहार वेळच्यावेळी घ्यावा. केळी, सफरचंद, आंबा, पपई, चिक्कू यांसारखी फळे खावीत. मुगाच्या डाळीचा आहारामध्ये भरपूर वापर करावा आणि खजूर नियमितपणे सेवन करावा.
 कुठलेही पदार्थ शिजवताना ते जरूरीपेक्षा जास्त शिजवू नये. त्यामुळे त्यांतील व्हिटॅमिनचा लाभ मिळताे.
Powered By Sangraha 9.0