तणावामुळे डाेक्यावरील केस विरळ हाेतात!

    01-Dec-2022
Total Views |
 
 

Hair 
हळूहळू केस कमी हाेतात आणि साठी गाठेपर्यंत त्याला ट्नकल पडलेले असते. ट्नकल हे साठीचेच लक्षण मानले जाते; परंतु आता नव्या पिढीत तिशीलाच ट्नकल पडायला लागले आहे. आपल्या आसपास तिशीसुद्धा न ओलांडलेले अनेक टकलू दिसायला लागले आहेत.यामागची कारणे काय? खरे म्हणजे ट्नकल हे अनुवांशिक मानले जाते. म्हणजे वडिलांना ट्नकल असेल, तर मुलालाही ते पडते परंतु अशाप्रकारचा अनुवांशिक टकलूपणा हा कमी वयात ट्नकल पडण्यास कारणीभूत ठरत नाही. अनुवांशिक ट्नकल असेल तर ते साठीतच पडते. मग विशीत किंवा तिशीत ट्नकल पडण्याचे कारण काय? त्यामागचे सर्वात माेठे कारण म्हणजे तणाव.
तणावावर मात करायला शिकल्यास लवकर ट्नकल पडणे टळू शकते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाेषक अन्नाचा अभाव.
 
आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेली काही सूक्ष्म पाेषण द्रव्ये कमी पडली की, शरीरामध्ये काही हार्माेन तयार व्हायला लागतात आणि हे हार्माेन केस गळण्यास कारणीभूत ठरते. हे हार्माे न चुकीच्या जीवनपद्धतीतूनही निर्माण हाेतात. तेव्हा जीवनपद्धती चांगली, निराेगी ठेवणे गरजेचे आहे.आपल्या शरीरामध्ये धूम्रपानामुळेसुद्धा काही बदल हाेतात. त्या बदलांमुळे शरीराला ऑक्सिजन कमी मिळताे.ऑक्सिजन कमी मिळाला की, केसांच्या मुळांचा आधार कच्चा हाेऊन केस गळायला लागतात. धूम्रपानातून शरीरामध्ये घेतले जाणारे निकाेटिन हे विषारी द्रव्य र्नताचा प्रवाह मंद करते आणि परिणामी केसांची वाढ खुंटते.म्हणजे सिगारेट ओढणे हेसुद्धा ट्नकल पडण्याचे एक कारण आहे.