मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही वार्षिक 60 हजार निर्वाह भत्ता

08 Nov 2022 14:35:02
 
 

Scholarship 
 
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.छत्रपती शाहू महाराज संशाेधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतंर्गत (सारथी) वसतिगृह, शिष्यवृत्ती याेजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा नर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेतर्फे सर्व जिल्ह्यांत डिसेंबरपासून 100 मुलांचे वसतिगृह सुरू हाेईल, याचे कालबद्ध नियाेजन करण्याची सूचना पाटील यांन केली. याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी.
 
वसतिगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्याेती, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करण्याचे आदेशही पाटील यांनी दिले.मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी परदेशी विद्यापीठांतील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपयांच्या मर्यादेत आणि पीएचडीसाठी 40 लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती याेजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा याेजनेची कर्जमर्यादा 10 लाखांवरून 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, कर्ज परताव्याचा कालावधीसुद्धा पाच वर्षांवरून सात वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0