वेळेचे नियाेजन

    29-Nov-2022
Total Views |
 
 

time 
 
हा संस्कार करायचा राहून जाताेय का? माेठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून माेठ्यांनीच आपले वागणे, बाेलणे यावर लक्ष दिले पाहिजे. कारण, ते जसे वागतील तशीच त्यांची मुले वागणार आहेत.मुले वेळेची शिस्त फक्त पालकांकडून शिकतात. बाबा वेळेवर गाेष्टी करीत नसतील, आई उशीर झाला की खाेटी कारणे सांगत असेल; तर वेळ पाळायची नसते आणि उशीर झाला की खाेटी कारणे सांगायची असतात, असेच संस्कार कळत-नकळत मुलांवर हाेतात.पालकांनी मनाला शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे काेंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच, घरही अव्यवस्थित असते.
 
मग घरात काेणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही.घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नकाे.आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर लहानपणापासून बिंबविले गेले पाहिजे. संस्कारांविषयी जेव्हा आपण बाेलताे तेव्हा माेठ्यांचा आदर, माेठ्यांच्या शब्दाबाहेर नसणे, याच गाेष्टी प्रामुख्याने बाेलताे.पण, खाेटे न बाेलण्याचा, वेळ पाळण्याचा, संस्कार आपण मुलांना देताे का? याचा विचार करण्याची आज गरज आहे. अर्थात, हे संस्कार करायचे असतील तर मुळात पालकांनी स्वतःला शिस्त लावायला हवी; नाहीतर मुले म्हणतील, आई, बाबा तुम्ही करीत नाही, मग आम्हाला का सांगता?