काैशल्य विकास, राेजगारविषयक कार्यक्रम प्रभावीपणे राबवू : उपमुख्यमंत्री

    29-Nov-2022
Total Views |
 
 

Skill 
चेंबूरमध्ये अनुसूचित जाती आणि नवबाैद्धांसाठी आयटीआयचे उत्साहात उद्घाटन जगात सध्या सर्वांत जास्त मागणी काैशल्याला आहे.अनुसूचित जाती आणि नवबाैद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल.तरुणांना काैशल्य आणि राेजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.चेंबूरमध्ये काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या औद्याेगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) इमारतीचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री बाेलत हाेते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लाेढा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
आजच्या काळात नाेकरीसाठी प्रभावी काैशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. चेंबूरमध्ये अनुसूचित जाती, नवबाैद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू हाेत असलेल्या आयटीआयमधून या समाजातील विद्यार्थ्यांना माेठा लाभ हाेईल.परिसरातील अनुसूचित जाती, नवबाैद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा, असे आवाहन आठवले यांनी केले. चेंबूरमधील आयटीआय सक्षम बनवण्यात येईल, असे लाेढा यांनी सांगितले.या आयटीआयमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी काैशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून, आठवले यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये काॅम्प्युटर ऑपरेटर व इलेक्ट्रिकल वायरमन या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारण 3 ते 6 महिन्यांचे अल्पमुदतीचे विविध अभ्यासक्रम या केंद्रावर विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.