अनेक राेगांवर गुणकारी ठरणारे गाजर

    29-Nov-2022
Total Views |
 
 

Carrot 
 
हिवाळ्यात याच्या नियमित सेवनाने मन प्रसन्न राहते. अलीकडेच जर्मनीच्या डाॅ्नटरांनी गाजरावर सखाेल शाेध केला आहे. ज्यामधून समाेर आले आहे की, गाजराच्या गाेडव्यामध्ये नैसर्गिक इन्सुलिन असते. जे पूर्णपणे मधुमेहात फायदा देते.गाजरामध्ये नैसर्गिक रूपात, 100 ग्रॅम मध्ये 1.5 मि.ग्रँ., लाेह आणि 80 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. म्हणूनच याचा रस नित्य सेवन करण्याने काविळ हा आजार ठीक हाेताे. तसेच गाजर कित्येक औषधी गुणांचे भंडार आहे. हे निर्बल शरीराला स्फुर्तीही प्रदान करते.देश-विदेशात याचे हजाराे औषधी प्रयाेग झाले आहेत. गाजराच्या रसामध्ये एका ताज्या लिंबाचा रस मिसळून पिण्याने यकृताची गडबडी दूर हाेतात.
गाजर भाजून सैंधव मिठाबराेबर खाण्याने सर्दी-पडसे दूर हाेते. 200 ग्रॅम गाजराच्या रसामध्ये 100 ग्रॅम पालकाचा रस मिसळून पिण्याने स्नायू दाैर्बल्यात अत्यंत लाभ हाेताे.