प्रत्येक क्षेत्रात टायमिंगला महत्त्व आहे

28 Nov 2022 19:43:08
 
 

time 
क्षेत्र काेणतंही असलं तरी ज्याला वेळेची किंमत कळते, ताे नक्कीच यशस्वी हाेताे. आपल्या आयुष्यात तर सर्वच गाेष्टीमध्ये उत्तम टायमिंग साधता आलं पाहिजे. ्नत कष्ट करून यश कधीच मिळत नाही, असं म्हणतात. त्या कष्ट करण्यालाही स्मार्टनेसची जाेड असायला हवी. त्या स्मार्टनेसमध्ये टायमिंग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.राजकारणात ज्याप्रमाणे उत्तम टायमिंगला महत्त्व असतं, तसंच ते अगदी नाटक-सिनेमातही असतं.म्हणजे, राजकारण करताना काेणता विषय कधी उचलून धरायचा, काेणती महत्त्वाची घाेषणा कधी करायची, माेर्चा कधी, आंदाेलन कधी, माैन कधी आणि अलिप्तता कधी, हे सगळं ठरवताना, टायमिंगला महत्त्व असतं.
 
नाटकातही एखादा प्रवेश सुरु असेल तर दाेन कलावंत एकमेकांच्या संवादांना कसा प्रतिसाद देतात आणि एकमेकांचे संवाद कसे टायमिंगसह उचलून घेतात, यावर त्या नाटकाचं यश अवलंबून असतं. एकंदरीतच टायमिंग ही ारच महत्त्वाची गाेष्ट आहे.नाटक सुरु असताना एखादा संवाद अपेक्षित वेळीच उच्चारला गेला नाही तर त्याचं महत्त्व कमी हाेतं, तसंच बाहेरही अनेक ठिकाणी हाेतं. वेळेचं महत्त्व ओळखून आपल्या मनातलं वाक्य बाेलणं, हे ज्याला समजतं, त्याला त्या टायमिंगचा ायदा घेता येताे. म्हणूनच, चांगल्या टायमिंगचे ायदे समजून घेतले पाहिजेत.जे लाेक वेळेचं महत्त्व ओळखून त्याचा चांगला उपयाेग करतात, ते कधीच अपयशी हाेत नाहीत.त्यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्यायला हवी.याची सुरुवात करणं कठीण वाटलं तरी हीच सवय आपल्याला यशस्वी बनवणार असते.
Powered By Sangraha 9.0