अनेक गुणांनी युक्त पुदिना

    28-Nov-2022
Total Views |
 
 

Pudina 
 
अनेक गुणांनी परिपूर्ण पुदिना मुळातच थंड असताे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पुदिना पाेटातील उष्णता व त्यासंबंधीच्या विकारांमध्ये लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार पुदिना औषधी गुणांनी यु्नत आहे. त्याचे सेवन चटणी किंवा अर्काच्या स्वरूपात केले जाते.प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ सतीशचंद्र शु्नला यांच्या मते पुदिन्याचे काही विशेष गुण.
 
 पुदिना पाेट स्वस्थ ठेवण्यासाठी उपयु्नत आहे. पुदिन्यामुळे पाेट संक्रमणापासून दूर राहते.
 पुदिन्यामुळे भूक वाढते.
 उलटी व जुलाब थांबविण्यासाठी पुदिना लाभप्रद आहे.
 उन्हाळ्यामध्ये शरीरातून अधिक घाम निघताे. त्यामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. त्यामुळे पुदिन्याचा अर्क पाण्यासाेबत घेतल्यास शरीरातील डिहायड्रेशनचे प्रमाण कमी करता येते.
 उचकी लागल्यास पाण्यासाेबत पुदिन्याचा अर्क घेतल्यास उचकी थांबते.
उन्हाळ्यात नाकातून र्नत पडत असल्यास पुदिना उत्तम औषध आहे.