मुंबई शहर ग्रंथाेत्सवाचे केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

    18-Nov-2022
Total Views |
 
 
Reading
 
वाचनसंस्कृती दृढ करणार : ग्रंथालय व शाळांत समन्वय साधणार ‘वाचनसंस्कृती घराेघरी- तिथे फुलती ज्ञानपंढरी, पुस्तकांशी करता मैत्रीज्ञानाची मिळते खात्री,’ असा संदेश देणारी ग्रंथदिंडी काढत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने आयाेजिलेल्या मुंबई शहर ग्रंथाेत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथाेत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत अपर पाेलिस आयुक्त संजय दराडे यांच्यासह विद्यार्थी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
 
या वेळी लेखक डाॅ. अच्युत गाेडबाेले, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन आदी उपस्थित हाेते.वाचनसंस्कृती वृद्धिंगत हाेण्यासाठी ग्रंथालय आणि शाळांमध्ये समन्वय साधण्यात येईल.मुंबई ग्रंथालय मराठीचे वैभव असून, त्यासाठी मराठी भाषा विभाग सर्वताेपरी सहकार्य करेल, असे केसरकर यांनी सांगितले. डाॅ. गाेडबाेले, मीनाक्षी पाटील, क्षीरसागर यांनी मनाेगत व्यक्त केले.तत्पूर्वी, केसरकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच, विक्रेत्यांशी संवाद साधत ग्रंथ खरेदी केली.