शारीरिक शिक्षण महाविद्यालये अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव करा

    15-Nov-2022
Total Views |
 


Education
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांचे निर्देश राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, सहसंचालक प्रकाश बच्छाव आदी अधिकारी उपस्थित हाेते.कायम विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालय एनसीटीई दिल्लीच्या मान्यतेने विद्यापीठाशी संलग्नित असून, महाविद्यालयात नियमित दाेन वर्षीय बी.पी.एड. व तीन वर्षीय बी.पी.ई. हे अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहेत.
 
ही महाविद्यालये 1994 पासून नियमित सुरू असल्याने कायम विनाअनुदानित तत्त्वावर त्यांचा समावेश हाेत नाही.कायम विनाअनुदानित तत्त्व 2001 नंतर राज्यातील महाविद्यालयांना लागू झाले आहे.1994 नंतरची 2001 पर्यंत सर्व महाविद्यालय अनुदानास पात्र आहेत, परंतु काही महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात अनुदान मिळण्याबाबत याचिका दाखल केली हाेती.या याचिकेच्या अनुषंगाने बैठकीत या महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.याबाबत नव्याने पुन्हा सविस्तर प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात येईल, असे सांगून याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.