गीतेच्या गाभाऱ्यात

11 Nov 2022 19:53:53
 
 
पत्र सत्ताविसावे
 

bhagavtgita 
 
लाेकांची अशीही समजूत झाली आहे की-ही पत्रे वाचून तुम्हाला पत्र पाठवले म्हणजे आपले कल्याण हाेते. तुम्हाला खूप पत्रे येतात. तुम्हाला साऱ्या पत्रांना उत्तर देण्यास वेळ नसणार हे मला माहीत आहे, पण जरी उत्तर पाठवले नाही, तरी तुम्हाला पत्र पाठवल्यामुळे आपले कल्याण हाेते अशी समजूत असल्यामुळे जाेपर्यंत पाेस्ट ऑफिस तक्रार करत नाही ताेपर्यंत मी तुम्हाला पत्रे पाठवणार.’ तू असे पहा की पत्राबद्दल लाेक माझी खूप स्तुती करतात.पण, खरं म्हणजे ती स्तुती गीतेची आहे. गीतेची उच्छिष्टे बाेलताे उत्तरे! काय म्या पामरे जाणावे हे।। असा प्रकार आहे. गीता डाे्नयावर घेऊन प्रवास करणारा मी एक सामान्य मनुष्य आहे.
 
एकदा येशू ख्रिस्त गाढवावर बसून चालले हाेते. लाेक त्यांचा खूप सत्कार करू लागले. गाढवाला वाटले हा आपलाच सत्कार आहे.गीतेच्या विचाराने भरलेल्या पत्राबद्दल लाेक स्तुती करत असताना ती आपलीच स्तुती आहे असे समजण्याचा गाढवपणा आपण कदापि करू नये.तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘तुम्ही आपल्या मुलीला अधून मधून पत्र पाठवता. एका पत्रात तुम्ही लिहिले हाेते- ‘तुझी आई पदवीधर नसेल पण गीतेच्या प्रकाशात प्रवास करणारी ती एक थाेर स्त्री आहे. तुझ्या आईसारखी आई तुला लाभली हे तुझे महाभाग्य आहे, असे मी समजताे. तू कसल्याही अडचणीत पडलीस किंवा तुझं मन अस्वस्थ झालं तर तुझ्या आईसारखी मैत्रीण तुला काेठेही सापडणार नाही.’ तुम्ही मला हा फार माेठा मान दिला. मी त्या लायकीची नाही, पण तुमच्या आशीर्वादाने मी तशी व्हावे, असे मात्र मला मनापासून वाटते.
 
आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. एका पत्रांत तुम्ही मला ज्ञानेश्वरांच्याबद्दल लिहिले हाेते. ते वाचून माझ्या डाेळ्यांत अश्रू आले. त्यामुळे माझे जीवन पुण्यमय झाले.तुम्ही खूप खूप वाचता. गीतेचा सिद्धांत असा आहे की आत्मा अमर आहे. हा सिद्धान्त एखाद्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्याने सांगितला आहे का? त्याचे जीवन वाचून आपल्या डाेळ्यात अश्रू येतात का? त्यामुळे आपले जीवन पुण्यमय हाेते का? तसं असेल तर पाश्चात्त्य तत्त्ववेत्यांचे जीवन मला सांगा. ते जाणून घेण्यास मी फार उत्सुक आहे. कृपा करून माझी ही विनंती मान्य कराच.अशा त्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचे नाव साॅक्रेटिस. पाश्चात्त्य लाेक तत्त्वज्ञानाच्या प्रांतात साॅक्रेटिसाला आद्यमान देतात. असे सांगण्यात येते की- डेलीशींशी र्लीेीसहीं झहळश्रेीेहिू षीेा हशर्रींशप ीें शरीींह (साॅक्रेटिसाने स्वर्गातून पृथ्वीवर तत्त्वज्ञान आणले),
Powered By Sangraha 9.0