आर्थिक स्वातंत्र्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक

    10-Nov-2022
Total Views |
संध्यानंद.काॅम

investment
जीवनात आर्थिक सुरक्षितता नसेल, तर पंचाईत हाेते.नाेकरी-व्यवसायातून मिळालेल्या पैशांची बचत करायला हवी आणि ते गुंतवायलासुद्धा हवेत. ही गुंतवणूकच तुमचा पैसा वाढवित असते. केवळ बचत आणि गुंतवणूक पुरेशी नसते, तर अर्थसाक्षरताही त्यासाठी हवी. निवृत्तीनंतरचे आयुष्य समाधानाने जगण्याएवढी पुंजी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी बदलत्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून गुंतवणूक करायला हवी. जगाचे पाहिले, तर गेल्या वर्षभरात विविध जागतिक आणि स्थानिक घडामाेडींमुळे शेअर बाजारात अस्थिरतचे वातावरण असल्याचे दिसते.
 
आधी काेसळलेला हा बाजार आता तेजीकडे वाटचाल करताे आहे. या स्थितीत रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणूक हे एक आव्हान झाले आहे; पण याही स्थितीत गुंतवणुकीच्या काही मूलभूत नियमांचे पालन केले, तर नुकसान टाळण्याबराेबरच दीर्घ कालावधीसाठी आर्थिक स्वातंत्र्यही मिळविता येईल.स्थिती अनिश्चिततेची असली, तरी गुंतवणूकदारांनी नुसते बसून राहू नये. बाजारातील प्रत्येक स्थितीत गुंतवणुकीची संधी शाेधताे ताे खरा गुंतवणूकदार ठरताे. आपले रिस्क प्राेफाइल आणि अ‍ॅसेट अ‍ॅलाेकेशनच्या गरजांनुसार गुंतवणुकीची स्किम निवडा आणि बाजारातील प्रत्येक स्थितीतून फायदा मिळवा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. ते काय म्हणतात ते बघा.आर्थिक स्वातंत्र्याची पाच पावले
 
1) अ‍ॅसेट अ‍ॅलाेकेशनमध्ये संतुलन कायम ठेवा संतुलित अ‍ॅसेट अ‍ॅलाेकेशनला प्रारंभ करा आणि आपल्या पाेर्टफाेलिओवर कायम राहा. तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि इ्निवटी गुंतवणूक साठ ट्न्नयांपेक्षा जास्त असेल, तर ती कमी करा; पण ती यापेक्षा कमी असेल, तर एसआयपीच्या माध्यमातून इ्निवटीतील गुंतवणूक वाढवा.
 
2) म्युच्युअल फंडातून गुंतवणूक करा इ्निवटी, डेट अथवा साेन्यासारख्या अ‍ॅसेटमध्ये किरती गुंतवणूक करावी, याबाबत तुमच्या मनात स्पष्टता नसेल, तर म्युच्युअल फंडाच्या अ‍ॅलाेकेशन स्किममध्ये पैसे लावा. यात कमी फी घेऊन फंड मॅनेजर तुमच्यातर्फे गुंतवणुकीचे व्यवस्थापन करताे.
 
3) आपल्यासाठी याेग्य स्किम निवडा तुम्ही इ्निवटी आणि डेटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, तर डायनेमिक अ‍ॅलाेकेशन स्किममध्ये जा. इ्निवटी, डेट आणि साेने अशा तिन्हींमध्ये पैसे टाकण्याची इच्छा असेल, तर मल्टीअ‍ॅसेट कॅटॅगिरीतील स्किम निवडा; पण फ्नत इ्निवटीच हवी असेल, तर व्हॅल्यू ओरिएंटेड स्किममध्ये गुंतवणूक करा.
 
4) एसआयपी सुरू करा तुमचे वय कमी असेल (30-35 वर्षे) तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) एखाद्या इ्निवटी फंडात गुंतवणूक सुरू करा आणि ती दीर्घकाळ चालू ठेवा. त्याचबराेबर वाढत्या वेतनानुसार दरवर्षी मासिक गुंतवणूक वाढवा.
5) एकरकमी गुंतवणूक करा तुमच्या बचत खात्यात माेठी र्नकम असेल, तर एकरकमी गुंतवणूक करा. मात्र, ती सुरक्षित असेल याची खबरदारी घ्या. एकरकमी गुंतवणुकीसाठी तुम्हाला अ‍ॅसेट अ‍ॅलाेकेशन स्किममधील बूस्टर एसआयपी आणि बूस्टर एसटीपीसारख्या फीचरचा उपयाेग करायला हवा.तज्ज्ञांनी हे पाच उपाय सांगितले आहेत. मात्र, आपल्या गरजा आणि जाेखीम यांचा विचार करूनच गुंतवणूक करणे सर्वांत याेग्य ठरते.