फाइव्ह-जी तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत क्रांती : मुख्यमंत्री

    03-Oct-2022
Total Views |
 

5G 
 
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंदेही झाले विद्यार्थी; खुर्चीऐवजी बेंचवर बसणे पसंत केल फाइव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी प्रारंभाच्या कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाइव्ह-जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आराेग्य, बँकिंगसह सर्वच क्षेत्रांत फाईव्हजी तंत्रज्ञानाने क्रांती हाेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते देशव्यापी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा प्रारंभ झाला. यात व्हर्च्युअल क्लासरूमसाठी पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांची निवड झाली हाेती.
 
या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित हाेते.पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. मीही तुमच्या साेबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी सांगितले.या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेलसह राज्यातील काही शाळांतील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि सिनेमे डाऊनलाेड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.या वेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पाेलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाइव्ह-जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना साेप्या शब्दांत माहिती दिली. माेबाइलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही त्यांनी केल