यशाचा मार्ग खुला हाेण्यासाठी काय कराल?

    01-Oct-2022
Total Views |
 
 

success 
 
यशाचा अर्थ हा अजिबात नसताे की, तुम्ही खूप सारे पैसे कमवावेत आणि माेठ्यात माेठ्या बंगल्यात राहावे. त्याचा अर्थ असा आहे की, दरराेज तुम्ही ते लक्ष्य मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याची तुम्ही तुमच्यासाठी निवड केली आहे. ज्याला तुम्ही आपल्या व्य्नितमत्त्वायाेग्य समजता. लक्ष्य कसेही असाे, ते आपल्या अस्तित्वाला अर्थ देते.करिअरमध्ये यशस्वी हाेण्यासाठी चांगले शिक्षण, चांगले संगाेपन यांचे खूप महत्त्व आहे.परंतु, असेही हाेऊ शकते की, काेणत्या तरी कारणाने तुमचे बालपणी चांगले संगाेपन झाले नसेल, इतर सुविधांपासून तुम्ही वंचित राहिला असाल. त्याचा अर्थ हा तर नाही की, आता काही केले जाऊ शकत नाही.साहित्यिक सारा देसाई यांचे मानणे आहे की, जर तुम्ही महान व्य्नतींच्या आत्मकथा वाचल्यात, तर समजेल की, सर्व विषम परिस्थिती असली, तरी जीवन चांगले केले जाऊ शकते. गरज आहे ती स्वत:ला सकारात्मक दृष्टीने पाहण्याची.
 
आपल्या गुणांना ओळखा जर काेणी तुमच्या व्य्नितमत्त्वावर नकारात्मक टिप्पणी केली, तर त्याला विसरून जा. चांगले तर हेच हाेईल की, तुम्ही केवळ त्याच लाेकांशी मैत्री करा किंवा जवळचे संबंध बनवा. जे तुमच्या दाेषांचा उल्लेख करताना गुणांचेही काैतुक करतील. आशावादी व्य्नतीची साथ प्रत्येक दृष्टीने चांगली असते. निराश व्य्नतीची साथ निराशच बनवेल. जर काेणी तुमच्यासाठी काही करत असेल, तर माेकळ्या मनाने त्याला धन्यवाद द्या. दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा. या लहान लहानहिरकणीसारख्या गाेष्टी जीवनाला चमकदार बनवितात. जशा व्यवहाराची अपेक्षा तुम्ही दुसऱ्यांकडून करता, दुसऱ्यांशीही तसेच वागा.
 
कधी काेणत्या गाेष्टीने मनाला स्पर्श केला, एखाद्या प्रशंसेने मधुर जाणीव दिली, जेव्हा माेठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला सहजतेने मिळाले, तर कुठे तरी लिहून ठेवा. आपले यश, चांगल्या आठवणी, नात्यांची सखाेल रुजलेली मुळे, काैटुंबिक सुख-दु:ख, आई-वडिलांचा कारुण्य भाव, त्यांचे रागावण्याचे क्षण आणि महत्त्वाचे गुण हे सर्व डायरीत लिहा.पुढच्या वेळी जेव्हा नकारात्मक किंवा निराशावादी विचार विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागतील, तेव्हा आपली डायरी वाचा.तुम्हाला आढळेल की, तुमचा तणाव कमी हाेत आहे. जेव्हा तुम्हाला याची जाणीव हाेते की, तुमच्या जीवनात चांगल्या गाेष्टी आहेत आणि तुमची काळजी घेणारे लाेकही आहेत, तर जीवन अधिकच साेपे आणि सुंदर हाेते.याला व्यावहारिक जीवनात उतरवून पाहा.तुम्हाला सर्व काही साेपे वाटेल. जीवनात यश मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे की, तुम्ही आपली याेग्यता आणि दाेष यांना ओळखून आपले लक्ष्य निश्चित करा.