लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हा ऐतिहासिक क्षण

    01-Oct-2022
Total Views |
 
 

Singing 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : पंडित हरिप्रसाद चाैरसिया, उषा मंगेशकर यांना पुरस्कार प्रदान लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून, या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जाेमाने सुरू हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2020 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना, तर 2021 चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरिप्रसाद चाैरसिया यांना प्रदान करण्यात आला.
 
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्याेगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ संगीतकार अशाेक पत्की, मीना खडीकर, साेनू निगम, आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै, ज्येष्ठ गायक अनुप जलाेटा, ज्येष्ठ गायक पंकज उधास, ज्येष्ठ गायक रूपकुमार राठाेड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव साैरभ विजय यांच्यासह रसिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, महाविद्यालयाच्या बाेधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
 
या महाविद्यालयातून भारतीय आणि वैश्विक संगीत शिकता येणार असून, जागतिक स्तरावर या महाविद्यालयाची कीर्ती पसरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उषा मंगेशकर, पं. चाैरसिया यांनी मनाेगत व्यक्त केले. या पुरस्कार साेहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वर-लता कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते.