भविष्यात राेबाेट आपल्यावर उपचार करतील

    01-Oct-2022
Total Views |
 
 

Robot 
 
अनेक सायफाय सिनेमात सगळं काम राेबाेट करताना तुम्ही पाहिले असेल. आता हे भविष्य दूर नाही. काही वर्षात आपण राेबाेट डाॅक्टरकडे देखील जाऊ. सध्या राेबाेट शस्त्रक्रिया करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार सर्वच क्षेत्रात बदल हाेत असतात. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही.गेल्या दाेन दशकांत औषधाेपचार आणि शस्त्रक्रियांच्या प्रकारात तसेच त्यासाठी वापरात असलेल्या तंत्रज्ञानातही बदल झाले. असाच एक प्रकार म्हणजे राेबाेटिक शस्त्रक्रिया. राेबाेटिक शस्त्रक्रिया म्हणजे राेबाेट किंवा काॅम्प्युटरद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया.1980 साली अमेरिकेत पहिल्यांदा राेबाेटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 1998 साली पहिली राेबाेटिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. 2010 नंतर भारतात राेबाेटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले.
 
राेबाेटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडिओ गेम असताे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. स्क्रीनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना याेग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी ऑपरेशन थेटरमध्ये दाेन उपकरणे असतात. यातील एक उपकरण असते टेलिमनिप्युलेटर ते एक्स्पर्टकडून हाताळले जाते, तर दुसरे म्हणजे यांत्रिक हात असतात. त्या माध्यमातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते.टेलिमनिप्युलेटरमध्ये तज्ज्ञाच्या पायाखाली आणि हाताजवळ हॅण्डल स्वरूपातील स्वतंत्र यंत्र बसविले जाते. हॅण्डलच्या मदतीनी एक्स्पर्ट डाॅक्टर ऑपरेशन करतात. स्क्रीनवर (थ्रीडी) अधिक स्पष्टता असल्याने शस्त्रक्रिया करणे साेयीचे जाते.