प्राधान्यक्रम ठरवून निधीचा विनियाेग करावा : सामंत

    01-Oct-2022
Total Views |
 
 
 

Raigad 
 
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील कामांचा घेतला आढावा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा याेग्य विनियाेग करण्याच्या सूचना रायगड व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिल्या.रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत सामंत यांनी या सूचना दिल्या.रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पाेलिस अधीक्षक अशाेक दुधे, आयुक्त गणेश देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन. पाटील, पाेलिस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग व सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित हाेते.
 
सामंत यांनी विविध याेजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती जाणून घेतली. अवैध मासेमारी, परराज्यातील मासेमारी बंद करण्याच्या दृष्टीने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.आराेग्य सुविधा बळकट करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. महिलाविषयक याेजनेची सर्व कार्यालये एका ठिकाणी आणण्यासाठी महिला भवन उभारणीचे काम पूर्ण करताना तेथे महिला बचत गटाच्या उत्पादन विक्री केंद्राची सुविधा आवर्जून उपलब्ध करून द्यावी. जिल्हा उद्याेग केंद्रामार्फत कर्ज वितरणासाठी बँकांना सक्त सूचना देण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.