तीन वर्षांत सर्व दस्त नाेंदणी कार्यालये शासकीय जागेत

    01-Oct-2022
Total Views |
जागा शाेधण्याचे महसूलमंत्री विखे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

GST
राज्याला वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या नाेंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची दुय्यम निबंधक कार्यालये लवकरच कात टाकणार आहेत. पुढील तीन वर्षांत राज्यातील सर्व दस्त नाेंदणी कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा शाेधण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सहाही महसूल विभागांमधील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.नाेंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमधून दरवर्षी 30 हजार काेटींपेक्षा अधिक महसूल शासनाच्या तिजाेरीत जमा हाेताे.
 
मात्र, मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नाेंद ज्या ठिकाणी हाेते, ती दुय्यम निबंधक कार्यालये नागरिकांच्या साेयीच्या जागेवर नाहीत. तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची वानवा आहे. तसेच, राज्यातील अनेक दस्त नाेंदणी कार्यालये तळमजल्याऐवजी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर आहेत.त्यामुळे शारीरिक विकलांग व्यक्तींसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेताे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने सर्व दस्त नाेंदणी कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.राज्यभरात 573 दस्त नाेंदणी कार्यालये आहेत. त्यांपैकी 333 कार्यालये शासकीय जागेत, तर उर्वरित 240 कार्यालये भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत.
 
ही 240 भाडेतत्त्वावरील दस्त नाेंदणी कार्यालये शासनाच्या जागेत पुढील तीन वर्षांत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.त्यासाठी महसूलमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना जागा शाेधण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्याचे नाेंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती जागा शाेधण्यात येणार आहे. ही जागा शासनाची असल्यास ती तातडीने नाेंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरित केली जाणार आहे. शासकीय जागा नसल्यास अशा प्रकारची जागा थेट खरेदी करून तेथे दस्त नाेंदणी कार्यालय सुरू केले जाणार आहे. शक्यताे तळमजल्यावरील जागा घेण्यात येणार आहे किंवा उदवाहनाची (लिफ्ट) साेय असलेल्या इमारतीतील जागा निश्चित केली जाणार आहे, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.