‘फाेमाे’ हाेण्यापेक्षा ‘जाेमाे’ हाेण्याचे समाधान अनुभवा

    01-Oct-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

FOMO 
 
काळाबराेबर जगण्याची पद्धतही बदलली आहे. पूर्वी लाेक मिळेल त्यात समाधानी हाेते आणि आपल्या कमाईनुसार खर्च करण्याच्या सवयीमुळे पैसा पुरत हाेता. आज उलट झाले आहे. गरज वाढविल्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी जास्त पैसे मिळविणे भाग आहे. आपल्याला सतत काही ना काही हवे असते. पण, सतत काही तरी घेण्याऐवजी काही देण्यातही आनंद असताे हे आपण विसरत चाललाे आहाेत.तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पण सध्या माहितीच्या महापुरात जगताे आहाेत. सतत काही ना काही माहिती, सूचना आपल्यापर्यंत येत असतात आणि त्याच्या भडिमाराखाली आपण एवढे दबून जाताे, की आपल्यासाठी काय उपयुक्त आणि गरजेचे आहे याचा विचार आपल्या डाे्नयात येत नाही. त्यातून वाढतात तणाव आणि नैराश्यासारखे विकार. सगळे काही मिळविण्यापेक्षा कधी तरी काही गमविण्याचा अनुभव घेतलात तरी जीवन खूप सुखाचे हाेऊ शकते. अमेरिकन विचारवंत रिचर्ड साॅल वुरमन यांनी त्यांच्या ‘इन्फाॅर्मे शन अँ्नझाइटी’ या पुस्तकात त्याचा ऊहापाेह केला आहे.
 
सतत माहिती आणि सूचनांच्या भडिमारामुळे आपली स्थिती कशी गाेंधळाची हाेऊ लागली आहे याची माहिती ते देतात. विशेष म्हणजे, वुरमन यांनी हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी लिहिले आणि तेव्हा क्षणाक्षणाला नाेटिफिकेशन पाठविणारे साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म अस्तित्वात नव्हते. मार्केटिंग तज्ज्ञ आणि विचारवंत रेगिस मॅककेन यांचे मतही असेच आहे. ते म्हणतात, की नवी तथ्ये, नवा विकास, नवे विचार आणि नव्या सूचनांच्या जंजाळात आपण एवढे फसलाे आहाेत, की आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान काळाकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही.‘जाेमाे’ आला काेठून? ‘जाॅय ऑफ मिसिंग आउट’ म्हणजे ‘जाेमाे’ या शब्दाचा प्रथम वापर जुलै 2012मध्ये अमेरिकन ब्लाॅगर आणि उद्याेजक अनिल डाश यांनी केला हाेता. साेशल मीडियावरील सक्रियता कमी करण्याबाबत त्यांनी हा शब्द वापरला हाेता. डाश यांच्या मुलाचा जन्म तेव्हा झाला हाेता आणि त्या बाळाच्या सहवासात त्यांनी खूप वेळ खर्च केला. त्यातून त्यांना केवळ आनंदच नव्हे, तर समाधानसुद्धा लाभले.
 
साेशल मीडियापासून दूर राहण्यामुळे किती फायदा मिळाला हे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ म्हणजे ‘फाेमाे’च्या विरुद्धार्थी ‘जाेमाे’ हा शब्द वापरला आणि आता ताे रुळला आहे. अनिल म्हणतात, ‘साेशल मीडियामुळे निर्माण हाेत असलेल्या थकव्यामुळे आपण ग्रस्त झालाे आहाेत. साेशल मीडियावर प्रभावी ठरावे म्हणून आपण अनेक बिनकामाच्या गाेष्टी करत राहताे. त्या न केल्या तरी जीवनात काही फरक पडत नाही, पण त्या करण्याच्या नादात आपण थकवा ओढवून घेताे आणि आवश्यक कामांसाठी आपल्याकडे ऊर्जा उरत नाही. एकमेकांना सूचना करण्याच्या घाईत आपण आपले समाधान आणि आनंद गमावून बसताे.’ जास्त सूचना वाईटच ‘राॅयटर्स’ या वृत्तसंस्थेने ‘इन्फाॅर्मेशन इज बॅड फाॅर यू’ या शीर्षकाखाली 14 ऑ्नटाेबर 1996 राेजी सर्व वृत्तपत्रांसाठी एक लेख प्रसिद्ध केला हाेता.
 
अतिप्रमाणात दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे कामकाजावर वाईट परिणाम हाेत असल्याचे त्यात म्हटले हाेते. कामकाज नव्हे, तर व्यक्तिगत जीवनातही उद्विग्नता आणि अन्य विकारही वाढत असल्याचा इशाराही देण्यात आला हाेता. जास्त प्रमाणातील सूचनांमुळे नातेसंबंध आणि खासगी वेळ यांच्यावरही प्रभाव पडत असल्याचे या लेखात म्हटले हाेते.द जाॅय ऑफ मिसिंग आउट’ या पुस्तकाच्या लेखिका आणि माेटिव्हेशनल स्पीकर ख्रिस्तिना क्रुक म्हणतात, ‘इंटरनेटवर दरराेज काेट्यवधी सूचना येतात. जेव्हा कधी आपण वेबवर जाताे तेव्हा काही ना काही नवीन दिसते आणि ते समजून घेण्यात आपली ऊर्जा संपते.’ त्यांचे हे मत विचार करण्यासारखे आहे. सूचना आणि संदेशांच्या भडिमारामुळे आपल्या जीवनात अकारण व्यग्रता, चिंता, द्विधा स्थिती आणि अडचणी वाढतात. उत्पादक अथवा गरजेच्या कामांत गुंतण्यापेक्षा आपण व्यर्थ घटनांत गुंतून जाताे आणि त्याचा परिणाम वाईट हाेताे, हे यातून स्पष्ट हाेते.
 
‘द जाॅय ऑफ मिसिंग आउट’ या पुस्तकाच्या लेखिका आणि माेटिव्हेशनल स्पीकर ख्रिस्तिना क्रुक यांनी जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी 31 दिवसांच्या इंटरनेट उपवासाचा प्रयाेग केला. या काळात त्या इंटरनेटपासून पूर्ण दूर राहिल्या. या काळात त्यांना खूप समाधान मिळाले आणि आनंद लाभला. त्या त्यांच्या मित्रांना भेटल्या, नातलगांची खबरबात घेतली. हे सगळे आपल्या किती जवळचे आहेत याचा अनुभव त्यांना याच काळात मिळाला. भरपूर वेळ असल्यामुळे त्यांनी कविता लेखनाचा नवा छंद जाेपासला. त्या म्हणतात, की गर्दीच्या मागे धावण्यामुळे तुम्हाला कधीच आनंद आणि समाधान लाभत नाही. आपण निवडलेल्या मार्गावरून चालण्यामुळेच आपला आत्मविश्वास वाढताे.
 
साेशल मीडियावरील आभासी जग आपल्या जीवनावर प्रभाव टाकू शकत नाही, असे त्यांचे मत आहे. आपण आपल्या कपाटाची ज्या पद्धतीने साफसफाई करताे, त्याच प्रकारे जीवनाचे ‘एडिटिंग’, म्हणजे साफसफाई करायला हवी, असे लेखकग्रेगमॅककियाेन यांना वाटते.लिएन स्टिव्हन्स या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, ‘फाेमाे’च्या भीतीमुळे आपण अनेकदा अनावश्यक घटनांनाही अकारण हाेकार देताे. ‘जाेमाे’मध्ये त्याच्या उलट असते. पण, याचा अर्थ काहीही न करता बसणे असा नाही.
आपल्या जीवनात आनंद मिळावा हा त्याचा हेतू असताे आणि अनावश्यक गाेष्टींसाठी हळहळायचे नाही असे त्यात अपेक्षित आह