एका पायाने चालवता येणारी टाटा टिएगाे कार लाँच

01 Oct 2022 17:57:09
 
 
 
 
 

EV 
 
 
सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टिएगाे इव्ही भारतात लाँच झाली आहे. ही इलेक्ट्रिक हॅचबॅक 28 सप्टेंबर राेजी लाॅन्च झाली आहे. यात क्रूझ कंट्राेल आणि वन पॅडल ड्राइव्ह टेक्नाॅलाॅजी सारखी वैशिष्ट्ये मिळतील.कंपनी म्हणाली, की Tiago EVप्रीमियम लेदर सीटसह येईल. यात वन पॅडल ड्राइव्ह तंत्रज्ञान असेल. या फीचरमुळे तुम्ही एका पायाने कार चालवू शकता. तुम्ही रेसिंग पॅडलवरून पाय काढताच, कार आपाेआप थांबते. यामुळे बॅटरी चार्ज हाेण्यास सुरुवात हाेते. Tiago EVमध्ये 26kWh बॅटरी आणि 74 लहि पाॅवर आणि 170 Nm टाॅर्क निर्माण करण्यास सक्षम असलेल्या इलेक्ट्रिक माेटरसह येण्याची अपेक्षा आहे.
 
Tiago EVमधील बॅटरी पॅक एका चार्जवर 310 किमी पर्यंतची रेंज देईल अशी अपेक्षा आहे. एवढेच नाही तर टाटा माेटर्स ढळरसे इलेक्ट्रिक आणल्यानंतर Tiago EV माॅडेल देखील लाॅन्च करू शकते.Tiago EVला Tigor EV प्रमाणे 26 bhp लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. या DC फास्ट चार्जरच्या मदतीने एका तासात 80 टक्केपर्यंत चार्ज हाेईल असे सांगितले जाते. याची किंमत 8 लाख 49 हजार रुपये आहे. टाटा माेटर्सने असेही स्पष्ट केले आहे, की टिएगाे इव्ही कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह येईल. ही कार कंपनीच्या ZConnectतंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, जे इतर टाटा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील आढळते.ही कार स्मार्टवाॅच कनेक्टिव्हिटीलाही सपाेर्ट करते.
Powered By Sangraha 9.0