‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळीपर्यंत राबवणार : तानाजी सावंत

    01-Oct-2022
Total Views |

Diwali
माता सुरक्षित, तर घर सुरक्षित हे अभियान दिवाळीपर्यंत राबवावे, अशा सूचना सार्वजनिक आराेग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंत यांनी दिल्या.डाॅ. सावंत यांनी पुण्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आराेग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. अतिरिक्त मुख्य सचिव डाॅ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नवीन साेना, आयुक्त तथा अभियान संचालक डाॅ. एन. रामास्वामी, आराेग्य संचालक डाॅ. साधना तायडे, डाॅ. नितीन आंबडेकर आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते .जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या यंत्रणेला कार्यान्वित करण्याच्या सूचना द्याव्यात.
 
जनजागृती, समुपदेशन, तसेच प्रत्यक्ष भेटी यावर पुढील काळात भर देऊन माेहीम यशस्वी करावी. माेहीम फक्त तपासणीवरच न थांबता पुढे गंभीर आजारासंबंधी उपचार आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत रुग्णास सर्वताेपरी मदत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या माेहिमेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताे आहे.या अभियानामुळे महिलांमध्ये आराेग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे, हे या अभियानाचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले. डाॅ. व्यास यांनी आराेग्य विभागांच्या याेजनांबाबत माहिती दिली. डाॅ. तायडे यांनी आभार मानले.