एक माली दाे फुल !

    09-Sep-2021
Total Views |
 
 

marriage_1  H x 
 
‘एक फुल दाे माली’ असे कथानक असणारे अनेक चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत आपण बघितले. यामध्ये चित्रपटाच्या शेवटी यातील एकाला माघार घेऊन दुसऱ्याचे अभिनेत्रीशी विवाह हाेताे, असे दाखविले जाते. केवळ चित्रपटातच नव्हे तर बहुतांशी अनेक प्रकरणांचा हाच शेवट असताे. याचा अर्थ एकाकडे आनंद तर दुसरीकडे दुःख असा हा प्रकार असताे. मात्र एकदम याच्या उलट आणि सर्वत्र आनंदीआनंद असे खराेखर घडले आहे. मात्र हे भारतात नव्हे तर इंडाेनेशियामध्ये.नुकतेच इंडाेनेशियात एक अनाेखे, अजब-गजब प्रकरण समाेर आले. एका तरुणाने एकाच वेळी त्याची वाग्दत्त वधू आणि माजी प्रेयसीसाेबत लग्न केले. हे प्रकरण पश्चिम नुसा टेंगारा प्रांतातील आहे. तेथील 20 वर्षीय काेरिक अकबर याचा विवाहसाेहळा सुरू हाेता. सर्व विधी पूर्ण हाेणार तेवढ्यात त्याची माजी प्रेयसी यूआनिता अचानक तेथे धडकली. अकबरची वाग्दत्त वधू काेटिमा हिने विवाहस्थळी काेणताही गाेंधळ निर्माण करण्याऐवजी प्रकरण शांततेने मिटवण्याचा निर्णय घेतला.
 
तिने कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली आणि अकबराला समजावून सांगितले की, युआनिता संबंध संपल्यानंतरही त्याला विसरू शकत नाही, त्यामुळे ताे इच्छित असल्यास युआनिताशीही लग्न करू शकताे. अकबर आणि युआनिता यांना हे आवडले आणि अशा प्रकारे एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी या दाेघींचा विवाह अकबरशी झाला.काेटिमा म्हणाली, माझ्या पतीची माजी प्रेयसी युआनिताला साेशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या लग्नाबद्दल कळले. लग्नासाठी अकबरच्या घरी पाेहचताच काही क्षणांनी युआनिता तेथे आली. तिने विवाहस्थळी पाेहाेचताच अकबरला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. अकबर हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला. मलाही असे काही हाेईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांचे नाते संपल्यानंतर त्यांच्यामध्ये काेणताही संपर्क नव्हता.
 
मात्र युआनिता वारंवार सांगत हाेती की, ती अकबरला विसरली नाही आणि त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांसाेबत असे ठरवले गेले की अकबरचे लग्न आमच्या दाेघांशी व्हावे आणि अशा प्रकारे आम्ही दाेघेही अकबरच्या बायका झालाे, असे काेटिमा हिने सांगितले.जरी आम्ही दाेघे एकमेकांना जास्त ओळखत नसलाे तरी आम्ही एकत्र राहण्यास तयार आहाेत. कारण तसे करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. या विवादास्पद लग्नाबाबत इंडाेनेशियन साेशल मीडियावर बरीच चर्चा झाली. केवळ टीकाकारच नव्हे तर अकबर यांनी स्वतः तरुणांना सांगितले की, माझ्यासारखे करण्याचा विचार करू नका. अकबर काम शाेधण्यासाठी मलेशियाला जाण्याचा विचार करत आहे आणि तिथे स्थायिक झाल्यानंतर दाेघांनाही ताे तेथे बाेलावणार आहे.