सीईटी 15 सप्टेंबरपासून हाेणार

    09-Sep-2021
Total Views |
 
 
 

CET_1  H x W: 0 
तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टाेबरदरम्यान हाेतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात 226 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान काेराेना नियमांचे पालन करण्यात येईल, तसेच राेज 50 हजार संगणक उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवेशाची नाेंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, तर अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टाेबरनंतर सुरू करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले. सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांत संभ्रमाचे वातावरण हाेते. आता या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.