काेकणात जाणाऱ्या गणेशभ्नतांच्या वाहनांना पथकरात सवलत

08 Sep 2021 13:11:55
 
एकनाथ शिंदे यांची घाेषणा : चाकरमान्यांसाठीच्या साेयीसुविधांचा घेतला आढावा
 

kokan_1  H x W: 
 
गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या गणेशभ्नतांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून, काेकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घाेषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभ्नतांच्या वाहनांना स्टिकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या दृष्टीने आवश्यक त्या साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार, अपर ेलिस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डाॅ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
काेकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहे. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे, तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे काेकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गाेवा महामार्ग, वाकण-पाली-खाेपाेली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची उर्वरित कामे दाेन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.काेकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पाेलिसांबराेबरच महामार्ग वाहतूक पाेलिस तैनात करण्यात आले असून, वाहतूक खाेळंबू नये, यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात आल्याचे वळसेपाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0