कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, पुनर्वापर करता येणारी उत्पादने वापरणे, प्लॅस्टिक कमीत कमी उपयाेग हे आहेत उपाय

0
हवामान आणि पर्यावरण प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण सहन करताे आहाेत. आपल्या जीवनशैलीचा प्रभाव त्यावर पडत असल्याची जाणीव झाल्यामुळे आता पर्यावरणस्नेही जीवन स्वीकारण्यास अनेकांनी प्रारंभ केला आहे. काही सवयी आत्मसात केल्या, तर आपण निसर्गाचे संरक्षण करू शकताे. बघा त्या सवयी.पुनर्वापर करता येणारी उत्पादने वापरा एकदाच वापरून टाकून द्यावी लागणारी प्लॅस्टिकसारखी उत्पादने वन्यजीवन आणि पर्यावरणाची हानी करतात. पण, कापडी पिशव्या, स्वयंपाक घरातील टाॅवेल, कचऱ्याच्या पिशव्या, चहा-काॅफीचे कप अशा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वापरून आपण हे हानीचे प्रमाण कमी करू शकताे. हात पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करण्याऐवजी कापडाचा वापर केला, तरी खूप उपयाेग हाेताे.कचरा कमी करा अन्नापासून प्लॅस्टिकपर्यंत अनेक प्रकारचा कचरा आपण टाकून देत असताे.
पण, त्यामुळे आपण आपल्या साधनसंपत्तीची हानी करत असताे आणि हा कचरा नष्ट करण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च हाेतात ते वेगळेच. शून्य प्रमाणात कचरा करणे (झीराे वेस्ट) हे फार माेठे आव्हान असले, तरी आपण त्याचे प्रमाण खूप कमी नक्कीच करू शकताे. त्यासाठी, परत परत वापरता येणाऱ्या रिचार्जेबल बॅटऱ्या वापरणे, तेच धाेरण पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसाठी ठेवणे आपल्याला करता येईल.खरेदीसाठी जाताना आपल्यासाेबत पिशवी ठेवली, तर अनावश्यक पिशव्या घरी येणे टळेल, म्हणजेच कचरा कमी हाेईल.पर्यावरणस्नेही उत्पादने वापरा वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर सुरू केला, तर उपयाेग हाेताे. त्यासाठी बांबूपासून तयार केलेले टूथब्रश वापरणे, पर्यावरणपूरक भांडी वापरणे असे करता येते. खरेदी करताना स्थानिक उत्पादकांना प्राधान्य द्या आणि नवी खरेदी करताना ती वस्तू पर्यावरणस्नेही असल्याची खात्री करा.
घरीच भाज्या पिकवा आपल्या घराची खिडकी, गॅलरी किंवा अंगणात आपल्या गरजेपुरत्या भाज्या पिकविता येऊ शकतात.
फळे आणि राेज लागणाऱ्या मसाल्यांची राेपही लावता येतात. याचा फायदा दुहेरी हाेताे. बाहेरून आणलेल्या वस्तूंच्या प्लॅस्टिक बॅगची गरज भासत नाही आणि घरीच ताजा भाजीपाला राेज मिळताे.स्वच्छतेची साधने काळजीपूर्वक वापरा राेजच्या वापरातील टूथब्रश, फेस स्क्रब आणि बाॅडी वाॅशसारख्या वस्तूंमध्ये सूक्ष्म प्रमाणात प्लॅस्टिक कण असतात. हे कण पर्यावरणात नष्ट हाेत नाहीत आणि ते पिण्याच्या पाण्याच्या स्राेतांमध्ये मिसळतात. तेथून ते अन्नपदार्थांत येतात. म्हणजे आपलीच हानी हाेते. वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू घेताना त्यात ‘मायक्राेबिड्स’ नसल्याची खात्री करा.खरेदीपूर्वी त्यातील घटक काेणते ते तपासून पाहा.