केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग खूपच उपयुक्त

20 Sep 2021 10:10:28
 
banana tree_1  
 
केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग पौष्टिक व आरोग्यवर्धक असतो. व्हिटॅमिन, आयर्न आणि फायबरयु्नत केळी तर फळाच्या रूपात आपण खातोच, पण केळीच्या झाडाचे इतर भाग म्हणजेच फुले, पाने, खोड इ.ही स्वयंपाकात व पदार्थ बनवण्यासाठी उपयु्नत असतात, तसेच याचा वापर अन्न शिजवण्यातही होतो. दक्षिण भारतात केळीच्या खोडाचा वापरही जेवणात केला जातो. त्यांचे वेगवेगळे उपाय पाहू या.
 
कच्चे केळ : कच्चे केळे कागदात लपेटून ठेवल्यास ते पिकते. आणि झाडावर पिकलेल्या केळापेक्षा खूप जास्त स्वादिष्ट असते. हे नैसर्गिक रूपात पिकते यासाठी ते हानिकारक नसते. याशिवाय कच्च्या केळाची सुकी भाजी, भजी व चिप्स बनतात. कच्चे केळ कुस्करून कोफ्तेही बनवले जातात.
 
केळीची पाने : दक्षिण भारतात केळीच्या पानांवर जेवण वाढले जाते, तसेच बंगाली व दाक्षिणात्यही यामध्ये अन्न लपेटून शिजवतात. यासाठी प्रथम केळीची पाने धुऊन पुसून घेतात. तुकड्यांमध्ये कापून जाळावर फिरवतात. जेणेकरून ती मुलायम होतील. यानंतर सुलट भागावर तेल वा तूप लावून चिकट करतात. नंतर त्यावर मसाल्यात लपेटलेले मासे वा भात वा मक्याचे पीठ, इडली, इडियप्पम ठेवून वा लपेटून शिजवतात. तेच दोन पानांमध्ये पानकीचे मिश्रण ठेवून तव्यावर शिजवतात.
 
केळीचे फूल : केळीचे फूल जेवढे सुंदर दिसते त्याची भाजीही तेवढीच लज्जतदार होते. या फुलांमधील एक कडक धाग्यासारखा भाग काढून प्रत्येक भाग खाल्ला जातो. वास्तविक, या फुलाची चव थोडीशी कडवट व स्टार्चयु्नत असते, पण लिंबाच्या रसात भिजवल्यानंतर चव चांगली होते. या ङ्खुलाची मसालेदार भाजी सॅलड, कटलेट, भजी व सूपही बनते.
Powered By Sangraha 9.0