कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी...

14 Sep 2021 10:34:14
 
work_1  H x W:
 
कामाच्या ताणाच्या व्यवस्थापनासाठी व्यक्तिमत्त्वात वैचारिक व इतर बदल होणे आवश्यक होते.
कमी वेळेत जास्त काम करण्याची क्षमता किंवा दिलेले काम जास्तीत जास्त अचूकतेने, वेळेत पूर्ण करण्याची क्षमता कर्मचार्‍याने प्रयत्नपूर्वक जोपासली, तर सरावाने कामाचा ताण कमी करणे शक्य होते.
 
कामासंदर्भात विषयातील वाचन, अभ्यास या गोष्टी कामातील रुची वाढवण्यास आणि कामाबद्दल आत्मविश्‍वास निर्माण करतात आणि पर्यायाने कामाचा ताण कमी होतो.
 
सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीकडे प्रगतीची संधी या दृष्टिकोनातून पाहिल्यास कामाच्या ताणाशी सामना करणे सोपे होते.
कामाव्यतिरिक्तच्या वेळात आपले वैयक्तिक छंद किंवा आवडीनिवडी जोपासाव्यात किंवा समवयस्क मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत हा वेळ व्यतीत केल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
 
दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती करणारे तंत्रज्ञान, उद्योग तसेच माहिती तंत्रज्ञान यामुळे कामाची गती, गरज आणि स्वरूप यात अपरिहार्य बदल होत आहेत. नवनवीन विषय आणि तंत्रज्ञानातील बारकावे यांच्याशी जुळवून घेण्याची बौद्धिक आणि मानसिक लवचिकता असली, तर कामाचा ताण कमी होतो.
Powered By Sangraha 9.0