दिल्लीत मानवी वस्तीत साप शिरण्याच्या प्रमाणात वाढ

14 Sep 2021 17:23:03
 
 
कडक उन्हाळा आणि मुसळधार पावसापासून बचावासाठी आश्रय घेण्याचा प्रयत्न
 

snake_1  H x W: 
 
मानवी वस्त्यांमध्ये साप येण्याच्या घटना वाढायला लागल्या आहेत. दिल्लीत जुलै-ऑगस्ट या काळात अशा घटना गेल्या वर्षीपेक्षा दीडपट जास्त घडल्याचे आकडेवारीवरून दिसते. कडक उन्हामुळे हाेणारी काहिली आणि मुसळधार पावसामुळे साप मानवी वसाहतींत येत असल्याचा अंदाज आहे.मानवी वसाहतींमध्ये येणाऱ्या सापांमध्ये नाग आणि मण्यारीसारख्या विषारी सापांचाही समावेश आहे. दिल्ली शहराच्या बहुसंख्य भागांत दाट वस्ती असली, तरी शहराच्या दाेन टाेकांना अरवली पर्वत आणि यमुना नदी असल्यामुळे वन्यजीवांचे वास्तव्यही आहे. त्याशिवाय शहरात अनेक उद्याने, बागा असून, हिरवाईसुद्धा भरपूर आहे. या अधिवासात साप राहतात. पण कडक उन्हाळा आणि पावसामुळे ते वस्त्यांमध्ये शिरू लागले आहेत. सापांच्या रक्षणाचे काम करणाऱ्या ‘वाइल्डलाइफ एसओएस’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत 218 घरांत साप घुसले हाेते.ही संस्था या सापांना बाहेर काढून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात साेडते.
Powered By Sangraha 9.0