दहा वर्षांपासून पाेलिस चाैकीत केस न गेलेले गाव

    14-Sep-2021
Total Views |
 
 
 
400 लाेकसंख्येच्या हसरा गावात 80 मण धान्य आणि 10 हजार रुपयांचा आहे काेष
 

police_1  H x W 
 
आदर्श वाटावे असे ‘हसरा गाव.’ या गावात भांडणतंटा झाल्यास काेणीही पाेलिसांकडे जात नाही. तर गावाची पंचायत त्यांच्या समस्या साेडवते, जे सर्वजण मान्य करतात. या अनाेख्या गावाची ही माहिती.चाेपन ब्लाॅक मध्ये एक गाव असे आहे, जेथे आजही प्रत्येक निर्णय गावातील पंचायत घेते. आदिवासी समाजातील ही पंचायत मारहाणीसारख्या मामल्यांचा सुद्धा निर्णय देते. ताे सर्वजण मान्य करतात. हेच कारण आहे की, सुमारे एक दशकापासून आजपर्यंत गावातील एकही प्रकरण पाेलिस चाैकीत गेलेले नाही. इतकेच नाही तर गावाचा स्वत:च 80 मणांचा धान्यकाेष (धान्य साठा) आणि 10 हजार रुपयांचा धनकाेष सुद्धा आहे. याच धान्य आणि धन काेषातून गरजूंना मदत केली जाते.या गावाचे हे वैशिष्ट्य आहे की, हे गाव पूर्णपणे नशामु्नत आहे. साेनभद्रच्या चाेपन ब्लाॅकमध्ये सुमारे 400 लाेकसंख्या असलेल्या हसरा गावाची आपली अशी एक पंचायत आहे.
 
जुगैल प्रदेशातील हसरा येथे ही व्यवस्था अनेक वर्षांपासून चालत आली आहे. गावातील आदिवासी समाजाची पंचायतच सर्व निर्णय घेते. समाजातील पंचायतीचा निकाल सर्वांत महत्त्वाचा मानला जाताे. गावात काही विवाद झाला तर, त्याचा निकाल गावाच्या पंचायतीतच हाेताे. म्हणूनच एक दशकापासून गावातील काेणताही वाद पाेलिस चाैकी किंवा काेर्टात गेलेला नाही. येथे धान्य आणि धन काेष आहे. आवश्यकता भासल्यास लग्नकार्यक्रमासाठी किंवा मंगल कार्यासाठी लाेक धान्य घेऊन जातात. आवश्यकता पडल्यास काेषातून आर्थिक मदतही घेतात.ती व्याजरहित असते. काेणाला किती धान्य आणि पैसे द्यायचे याचा निर्णय सुद्धा पंचायतच करते. घेतलेले धान्य आणि पैशांना संबंधित परिवार आपल्या सुविधेनुसार परत काेषात जमा करतात.