टर्कीमध्ये उभारले वाद्यांचे संग्रहालय

    14-Sep-2021
Total Views |
 
 
 

museum_1  H x W 
 
टर्की या देशाची माहिती असलेल्यांना तेथील संगीत परंपरेचे असलेले महत्त्वही माहिती असते. देशाच्या संस्कृतीत संगीत महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्याकडे संगीत क्षेत्रात जशी घराणी आहेत, तशी घराणी तेथेही आहेत. शैलीतही प्रकार आहेत. अभिजात शास्त्रीय संगीत, लाेकसंगीत आणि अंताेलिअन राॅक हे त्यांपैकीच काही प्रकार. याचप्रकारे टर्कीमध्ये वाद्यांचीही समृद्ध परंपरा आहे. त्यामुळेच वाद्य संग्रहालय टर्कीची शान बनले आहे.टर्कीमधील वाद्यपरंपरेची साक्ष देणारे एक संग्रहालय बुर्सा येथे उभे राहिले आहे. मात्र, केवळ टर्कीतीलच नव्हे, तर जगभरातील वाद्येही येथे पाहायला मिळतात. सुमारे 300 वाद्ये येथे ठेवण्यात आली आहेत. संगीतज्ज्ञ डाॅ. हुसैन पार्कन संन्लाेकाेल यांचे कुटुंबीय आणि निलूफेर महानगरपालिका यांच्या प्रयत्नांमुळे हे संग्रहालय साकार झाले आहे.
 
डाॅ.
संन्लाेकाेल हे व्यवसायाने डाॅक्टर हाेते आणि संगीताचे चाहते हाेते. ते स्वतःही वाद्ये वाजवत आणि त्यांची पत्नी पिआनाेवादक हाेती. दाेघांनीही एकत्र सर्व जग पालथे घातले आणि वाद्यांचा संग्रह केला. त्यांच्या संग्रहालयातील वाद्येही बुर्सा संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. हे संग्रहालय उभारताना टर्कीतील अन्य संगीतप्रेमींनीही नवी वाद्ये विकत घेण्यासाठी देणग्या दिल्या. डाॅ. संन्लाेकाेल यांचे पुत्र मेहमेत यांनी या संग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे. ते स्वतः संगीतकार असून, ग्रॅमी अ‍ॅवाॅर्डसाठीही त्यांचे नामांकन झाले हाेते. टर्कीच्या पारंपरिक संगीताबराेबरच जॅझ आणि पाश्चात्य संगीताचे ते तज्ज्ञ आहेत.