मेट्रिक पद्धत म्हणजे काय?

    14-Sep-2021
Total Views |
 
metric_1  H x W
 
जसजशी विज्ञान या विषयात माणसाने प्रगती केली तसतशी वजन, माप या संबंधीची एक समस्या त्याच्यापुढे उभी राहिली. कारण प्रत्येक देशातील वजन व मापे घेण्याची पद्धत वेगवेगळी होती.
 
१८ व्या शतकात संशोधकांनी असा विचार मांडला की, अशी एखादी वजन व मापे घेण्याची पद्धत शोधून काढली पाहिजे, जी सर्व देशांमध्ये समानरूपाने वापरता येईल. या संशोधकांच्या विचारांना मूर्तरूप दिले ते फ्रांसने. १७९१ च्या सुमारास फ्रांसने जगासमोर ही मेट्रिक पद्धत आणली.
 
मेट्रिक पद्धतीमध्ये लांबीचे परिमाण मीटर ठेवण्यात आले. म्हणूनच या पद्धतीचे नाव मेट्रिक पद्धत ठेवण्यात आले. मेट्रिक पद्धती ही साधी सोपी वजन, माप करण्याची पद्धती आहे. याच्या परिमाणांची गणना फारच सरळ, सोप्या पद्धतीने करता येते.