वजनदार लेहेंगा माॅडेलला नाही झेपला, चालताचालता ती आपटली...

    14-Sep-2021
Total Views |
 
 

lehenga_1  H x  
आपल्याला झेपेल तेवढेच करावे, हेच खरे. नाहीतर सर्वांदेखत फजिती हाेऊ शकते.बहुतेक सर्व माॅडेल्समध्ये आत्मविश्वासाने रॅम्प वाॅक करण्याची ताकद असते, पण कधीकधी काही माॅडेल्सवर व्यासपीठावरच फजिती येण्याची वेळ येते. कारण त्या आपल्या ताकदीपेक्षा वेगळेच करायला जातात. एक ब्रायडल फॅशन शाे नुकताच झाला. म्हणजे वधूची वस्त्रे घालून रॅम्प वाॅक करायचे. या शाेमध्ये वधूचा लेहेंगा घातलेली एक माॅडेल रॅम्प वाॅक करताना व्यासपीठावरच आपटली.ही माॅडेल व्यासपीठावर आत्मविश्वासाने चालत हाेती. तिने लेहेंगा घातला हाेता आणि ’ लेहेंग्याला मॅचिंग दागिनेही घातले हाेते, पण तिचा लेहेंगा इतका जड हाेता, की ताे तिला आवरता आला नाही. त्यामुळे चालताचालताच ती पडली. पडताना तिने पुढे चालणाऱ्या दुसऱ्या माॅडेलच्या ओढणीवर पाय दिला.
 
मात्र, अन्य एका माॅडेलने पडलेल्या माॅडेलला हात धरून उभे राहण्यास मदत केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ साेशलमीडियावर व्हायरल झाला असून केवळ काही तासांतच या व्हिडिओला 16 हजार व्ह्यूज आणि 27 हजार लाइक्स मिळाले.
पडलेली माॅडेल न खचता पुन्हा आत्मविश्वासाने उभी राहिली, याचे काहींनी काैतुक केले, तर तिला मदत करणाऱ्या दुसऱ्या माॅडेलचे काैतुक काहींनी केले आहे. मात्र, पडलेल्या माॅडेलने या घटनेला लेहेंगा जबाबदार नाही, तर व्यासपीठाची रचना जबाबदार असल्याचे सांगितले.कारण रचना नीट नसल्याने सर्व माॅडेल्सना चालण्यासाठी नीट जागा नव्हती. त्यामुळे पुढे असलेल्या माॅडेलच्या ओढणीत आपला पाय अडकला आणि आपण पडलाे, असा खुलासा तिने केला आहे.