काेयना, चांदाेली धरणे भरण्याच्या मार्गावर

    14-Sep-2021
Total Views |
 
 
 

koyna_1  H x W: 
 
पश्चिम घाटातील पावसाने अन्य धरणांतील साठ्यातही वाढ गेल्या चार दिवसांपासून पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने काेयना धरणात 102 टीएमसी पाणी साठा झाला असून, चांदाेली धरण काठाेकाठ भरण्याची केवळ औपचारिकताच उरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र पावसाचा जाेर ओसरला असून, आता रब्बी हंगामासाठी परतीच्या मान्सूनकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणांतील पाणीसाठ्यांत वाढ झाली असून, ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.गेल्या चार दिवसांपासून पश्चिम घाटात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काेयना, चांदाेलीसह राधानगरी व दूधगंगा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
 
काेयना धरणात 102 टीएमसी पाणीसाठा झाला असून, या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.34.40 टीएमसी क्षमतेच्या चांदाेली धरणात 34.35 टीएमसी पाणी साठले आहे. धरण काठाेकाठ भरण्यास केवळ 0.05 टीएमसी पाणी कमी असून, धरणातून 2323 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.काेयना धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. काेयना शिवसागराचा पाणीसाठा दीड महिन्यांत सुमारे 17 टीएमसीने वाढून ताे 102 टीएमसी (96.91 टक्के) झाला आहे. पुणे जिल्ह्यातील माणिकडाेह, घाेड, खडकवासला वगळता पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणे तुडुंब भरली आहेत.