हॉंगकॉंगमध्ये ‘देवांचे रिटायर होम’

    14-Sep-2021
Total Views |
 
god retire home_1 &n
 
देव कदाचित कधीही रिटायर होत नसावेत, पण देवाचे भक्तच देवाला रिटायर्ड करतात व देवाची मूर्ती नदीत किंवा समुद्रात विसर्जित करतात; पण समुद्र या मूर्ती दुसर्‍या दिवशी किनार्‍यावर आणून टाकतो. अशा देवांच्या मूर्तींसाठी हॉंगकॉंग येथील ८८ वर्षांचे पिंगपोंग यांनी ३० वर्षांपूर्वी ‘देवांचे रिटायर होम’ सुरू केले आहे.
 
देवांचे हे ‘रिटायर होम’ वॉटर फॉल वे पार्कमध्ये आले आहे. पिंगपोंग या ‘गॉड्स रिटायर होम’मधील भगवान गौतम बुद्ध हॉंगकॉंगमध्ये पूजनीय ताओ इ. धर्मांच्या देवी-देवतांच्या मूर्तींची या पार्कमध्ये व्यवस्था करून मूर्तींची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. त्यांनी या गॉड रिटायर होमला ‘स्काय फुल ऑफ गॉडस अँड बुद्ध’ असे नाव दिले आहे.
 
लोक मूर्ती खराब किंवा खंडित झाल्यास एखाद्या झाडाखाली ठेवतात. पिंगपोंग या मूर्ती या देवांच्या रिटायर होममध्ये आणतात. पिंगपोंग आता ८८ वर्षांचे असले, तरी त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे.