भारत आहे जगातील दुसरे सर्वार्ंत मोठे ई-लर्निंग मार्केट

    14-Sep-2021
Total Views |

e-learning_1  H 
 एज्युकेशन इंडस्ट्री २०२५ पर्यंत १६.४२ लाख कोटी रुपयांची असेल  
 
देशात शिक्षण उद्योगाचे प्रमाण मोठे आहे. कोरोना महामारीमुळे आता ऑनलाइन शिक्षणाला पालक प्राथमिकता देत आहेत. यामुळे ई-लर्निंगचे प्रमाण वाढले आहे.
 
सध्या सर्वांत जास्त युवक लोकसंख्या (५-२४ वर्षे) सुमारे ५५ कोटी ही भारतात आहे. देशात शाळेत जाणार्‍या मुलांची संख्या सुमारे २६ कोटी आहे. हे दोन आकडे सांगतात की, शिक्षण उद्योगाचे देशातील भविष्य किती सोनेरी आहे? मीडिया रिपोर्टनुसार सन् २०२० मध्ये देशाच्या एड-टेक स्टार्टअप्सने सुमारे १६,२०४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली.
 
जी सन् २०१९ मध्ये केवळ ४,०३६ कोटी रुपये होती. इंग्लिश प्रोफेशिएंसी इंडेक्स २०२० द्वारे जारी केलेल्या आकड्यांनुसार जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणार्‍या देशांमध्ये भारताचा नंबर ५०वा आहे. हे ते वैशिष्ट्य आहे, जे भारतीयांना जगात वेगळे स्थान देते.
 
इथे ग्लोबल एज्युकेशन वेगाने स्वीकारले जाते. हेच कारण आहे की, ऑनलाइन एज्युकेशनच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या नंतर जगातील दुसरा सर्वार्ंत मोठा ई-लर्निंग मार्केट झाला आहे. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) च्या नुसार एप्रिल २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत शिक्षणाच्या क्षेत्रात ३२,८११ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली.
 
तीन सर्वात लोकप्रिय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म - यूजीओव्ही द्वारे केल्या गेलेल्या सर्व्हेनुसार ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बायजूज देशात सर्वार्ंत जास्त पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. सर्व्हेत सामील ६५% कुटुंबांनी सांगितले की, त्यांची मुले या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबरवर क्रमश: अनऍकॅडमी आणि वेदांतु होते. क्रमश: ३० आणि २९ टक्के कुटुंबांनी मुलांद्वारे या प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे सांगितले. यूजीओव्ही आणि १६ पासून २२ जून २०२० पर्यंत २०१५ परिवारांमध्ये हा सर्व्हे केला होता.