काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा निर्णय : विधायक कामांना देणार प्राधान्य

    14-Sep-2021
Total Views |
 
 

corona_1  H x W 
 
दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे आठशे गावांनी ‘एक गाव, एक गणपती’चा विधायक उपक्रम राबवला आहे. त्यात सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून, सांगली जिल्ह्यातील 64 गावांनी उत्सवाला फाटा देत ती रक्कम विधायक कामांसाठी देण्याचा काैतुकास्पद निर्णय घेतला आहे. काेराेना आणि महापुरामुळे या भागास माेठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर गावांनी एकत्र येत विधायक उपक्रमाला बळ देण्याचा संकल्प यशस्वी केला.गेल्या वर्षी काेराेनामुळे गणेशाेत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले हाेते.वर्षानंतरही परिस्थिती सुधारली नाही. दक्षिण महाराष्ट्रातील काेल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना यंदा काेराेनाचा अधिक फटका बसला. त्यामुळे यंदाचा गणेशाेत्सव साधेपणाने साजरा करण्याची मानसिकता तयार झाली.दक्षिण महाराष्ट्रातील 753 गावांनी यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवला आहे.
 
त्यामुळे या गावांत एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यात सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली. या जिल्ह्यातील 424 गावे या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्या पाठाेपाठ काेल्हापूर जिल्ह्यातील 292 गावांचा समावेश आहे. गणेशाेत्सव साधेपणाने साजरा करत वाचवलेली रक्कम विधायक कामांना वापरण्याचे नियाेजन आहे. काेविड सेंटर, काेराेना रुग्णांना, तसेच महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ही मदत देण्यात येणार आहे.जुलैत आलेल्या महापुराचा फटका सांगली जिल्ह्याला बसला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 64 गावांनी गणेशाेत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला. उत्सवाचा खर्च टाळून ती रक्कम विधायक कामाला देण्याचे पाऊल या गावांनी उचलले आहे.