ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या प्रचारासाठी महसूलमंत्री थाेरात पाेहाेचले बांधावर!

14 Sep 2021 17:56:22
 
 
 
app_1  H x W: 0
 
शेतकऱ्यांचे काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे साेपे आणि बिनचूक करण्यावर राज्य सरकारकडून भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना पिकांच्या नाेंदी सरकारकडे करण्यासाठी ई-पीक पाहणी तंत्रज्ञान आणले आहे. या ऑनलाइन पद्धतीला प्राेत्साहन देण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाेहाेचले.त्यांच्या हातातील माेबाइल घेऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.स्वत: मंत्रीच पुढाकार घेत असल्याने यंत्रणाही कामाला लागली असून, जास्तीत जात शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी तयार केले जात आहे. थाेरात यांच्या संगमनेर तालुक्यात सुमारे 80 टक्के शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केला आहे.
 
थाेरात यांनी ऑनलाइन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सात-बारा दुरुस्तीसह डिजिटल सात-बारा घरपाेच देण्याच्या याेजना आणल्या आहेत. त्यापैकीच ई-पीक पाहणी प्रकल्प आहे. याच्या माेबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे शेतकरी स्वत: आपल्या शेतातील पिकांची नाेंदणी करू शकताे. यासाठी तलाठ्याकडे जाण्याची, तलाठ्याने शेतावर येण्याची गरज नाही. या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम सुरू आहेत. यामध्ये स्वत: थाेरात यांनीही भाग घेतला आहे. आनंदवाडीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या हातातील माेबाइलमध्ये त्यांना याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखवले.
Powered By Sangraha 9.0