पुण्यातील काॅलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेले डाॅ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह काेश्यारी यांनी डाॅ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली आहे.डाॅ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेत सल्लागार- 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. डाॅ. मालखेडे यांनी अमरावतीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई व एमई पदवी प्राप्त केली. त्यांनी आयआयटी मुंबईतून पीएचडी मिळवली असून, त्यांना प्रशासन, संशाेधन व अध्यापनाचा व्यापक अनुभव आहे.