‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवेबाबत एलाॅन मस्क यांचा दावा
कृत्रिम उपग्रहांवर आधारित असलेली ‘स्टारलिंक’ ही इंटरनेट सेवा प्रकाशाच्या गतीने डेटा ट्रान्स्फर करण्याच्या क्षमतेची असेल, असा दावा ‘स्पेसए्नस’चे प्रमुख एलाॅन मस्क यांनी केला आहे. सध्या एक डिश, उपग्रह आणि ग्राउंड स्टेशनच्या मदतीने सेवा चालते.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या ग्राउंड स्टेशनना टाळण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.ग्राउंड स्टेशनवरून उपग्रहांबराेबर संपर्क हाेत असला, तरी त्याला खूप वेळ लागत असल्यामुळे डेटा वेगाने ट्रान्स्फर करण्यात अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेसर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ट्रान्समिशनची गती ऑप्टिकल फायबरच्या तुलनेत चाळीसपट अधिक वेगवान हाेईल, असे मस्क यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग आणखी वाढणार असल्याचे या संदर्भातील एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.ऑप्टिकल फायबरच्या सध्याच्या वेगाचा विचार करता, ‘स्टारलिंक’ प्रतिसेकंद 1 लाख 80 हजार 832 मैल वेगाने डेटा ट्रान्स्फर करू शकेल, असा दावाही करण्यात आला आहे. हा वेग जवळपास प्रकाशाच्या वेगाएवढा, म्हणजे 97 पट असून, त्यामुळे यूजर्सना त्याचा फायदा हाेईल.