कन्या

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
गाेष्टी एकमेकांत मिक्स करू नका. जर तुम्हीफिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर काम तेवढ्या दिवसांसाठी दूर ठेवा. या आठवड्यातफिरण्याचा कार्यक्रम करू शकता. पण कामाचे ओझे साेबत घेऊन जाल तर तुम्हीफिरण्याचा आनंद घेऊ शकणार नाही. यासाठी प्रथम काम पूर्ण करून नंतरचफिरण्याचा प्लॅन करा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यामध्ये एक नवी ऊर्जा दिसून येत आहे. नवे विचार नवा दृष्टिकाेन दिसत आहे. पण त्वरित त्या मार्गाने गेल्यास जुनी स्थिती परत येऊ शकते. प्रत्येक याेजनेचे याेग्य मूल्यांकन आणि दीर्घ कालावधीतील त्याचे परिणाम पाहून व समजूनच काेणताही निर्णय घ्या.
 
नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबीयांसाेबत उत्तम वेळ घालवण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. दीर्घकाळानंतर तुम्ही तुमच्या माणसांना समजण्याचा व ऐकण्याचा प्रयत्न कराल. ज्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील. मित्र व नातलगांसाेबत एखादी याेजना बनवू शकता. पण कुटुंबाची उपेक्षा करू नका.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही माेसमी समस्यांनी प्रभावित हाेऊ शकता. पण त्वरितच त्यावर नियंत्रणही मिळवाल. या आठवड्यात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. या शिवाय तुम्हाला आराेग्याची इतर काेणतीही समस्या नाही.
 
शुभदिनांक : 12, 15, 16
 
शुभरंग : नारंगी, जांभळा, लाल
 
शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
 
दक्षता : या आठवड्यात लिलावासारख्या व्यवहारांपासून दूर राहण्यातच हुशारी आहे. जुन्या वस्तू खरेदी करू नका..
 
उपाय : बुधवारी गणेश अथर्वशीर्षाचा पाठ करावा. त्यानंतर पेढ्यांचा नैवेद्य दाखवून ते सर्वांना वाटावेत. यानंतर थाेड्या वेळाने तूप-गूळ गाईला खाऊ घालावे. यामुळे आर्थिक् समस्यांतून सुटका हाेईल..