प्रवासाचा बेतही ठेवतो तुम्हाला आनंदी

    13-Sep-2021
Total Views |

tour_1  H x W:  
 
ज्या मिनिटाला आपण एखाद्या प्रवासाच्या योजनेची आखणी सुरू करता, तेव्हा तुमच्या आनंदात वाढ होते.
कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्याने आता दिवाळीनंतर प्रवासाचे योग आखले जात आहेत. कोरोनामुळे प्रत्येकाच्या प्रवासावार मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे कोरोना गेला की लोक प्रवासाचे बेत आकणार हे नक्की आहे. खरे पाहिल्यास आरोग्य हीच संपत्ती आहे. आपण हे हजारदा ऐकले आहे. म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी आपण नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि अजून काय करत नाही!
 
उत्तम आरोग्य आणि नेहमीच ताजेतवाने राहण्यासाठी अजून एक छान उपाय म्हणजे प्रवास! होय, हे आश्‍चर्यजनक आणि अविश्‍वसनीय आहे, नाही का? पण वर्षातून एक चतुर्थांश काळ प्रवास हा डॉक्टरांना आपल्यापासून दूर ठेवतो!
 
ज्या मिनिटाला आपण एखाद्या प्रवासाच्या योजनेची आखणी सुरू करता, तेव्हा तुमच्या आनंदात वाढ होते. वस्तुतः पाहिले तर जेव्हा तुम्ही एखाद्या सहलीला निघता त्यावेळी ती भावना तुम्हाला आपले आरोग्य, कल्याण, कुटुंब, नातेसंबंधा बाबत अधिक आनंदी ठेवते. काही विकत घेण्याच्या आनंदापेक्षा प्रवास किंवा सफारीचा अनुभव तुम्हाला जास्त आनंद देतो. तर आपल्या पुढील सफरीची योजना सुरू करा.
 
प्रवासाला जाणे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त आहे. प्रवासाचे अनुभव आपल्याला नव्या वातावरणाची ओळख करून देतात आणि शरीरात मजबूत प्रतिपिंडे तयार करतात. प्रवासामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तेव्हा इतर औषधे सोडा आणि प्रवासाचे औषध घ्या!
 
प्रवास केल्याने तणाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. प्रवासामुळे आपल्याला अराम मिळतो. आपण कमी चिंतित आणि जास्त आनंदी होतो. प्रवासामुळे तुमची मन:स्थिती सुधारते आणि याचा अनुभव आपल्याला प्रवासानंतर अनेक आठवडे येत राहतो. तेव्हा स्वताःची जास्त ओढाताण न करता प्रवासाला निघा आणि आपल्या तणावाला आणि चिंतेला रामराम करा.
 
प्रवासात आपण नव-नवीन लोकांना भेटतो आणि नवीन परिस्थितींमध्ये समायोजित होतो. त्यामुळे प्रवासात आपल्या मनाचा विस्तार होतो. आपण जागतिक स्तरावर आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जागरूक होतो. प्रवास आपल्या बुद्धीला आणि मनाला चालना देतो. तसेच आपली सर्जनशीलता वाढवतो. व्यक्तिमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासकर्त्यांनुसार जे लोक प्रवास करतात ते अधिक खुल्या मनाचे आणि भावनात्मक स्थिर असतात.