या आठवड्यात आश्चर्यजनक रुपात सारे काही तुमच्या बाजूने जाताना दिसत आहे. महादेवाच्या कृपेने तुम्ही ज्या काेणत्या कामाची सुरुवात कराल त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुम्ही अतिआत्मविश्वासी हाेऊ नये. उलट खूप हुशारीने पुढील रणनीती ठरवण्याची गरज आहे.
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही उघड्या आकाशात असणार आहात. जिथे तुमच्याकडे खूप काही करणयाची संधी असेल. परिस्थिती व लाेक तुमच्या बाजुने असतील व तुमच्या कामात मदत करतील. कित्येक दिवसांपासून तुम्ही जी याेजना बनवत आहात ती लागू करण्याची वेळ आली आहे.
नातीगाेती : तुमच्यासाठी नाती जेवढी महत्त्वाची आहेत तेवढेच तुम्ही देखील तुमच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे आहात. कार्यस्थळ, समाज आणि मित्रांमध्ये स्वत:ला एवढें गुंतवू नका की, कुटुंबासाठी तुमच्याकडे वेळच नसेल. यावेळी त्यांना तुमची अत्यंत गरज आहे. विशेषत: तुमच्या भावनिक सपाेर्टची.
आराेग्य : या आठवड्यात डाेळ्यांसंबंधित त्रास हाेऊ शकताे. कामाच्या व्यापात याकडे दुर्लक्ष करू नये. लग्नसमारंभात व पार्ट्यांमध्ये जाण्याची भरपूर संधी मिळणार आहे. या काळात स्वत:च्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. जेणेकरून पचनासंबंधित काेणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
शुभदिनांक : 12, 15, 16
शुभरंग : पांढरा, गुलाबी, निळा
शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : उत्साहाच्या भरात बाेलण्यवरील ताबा गमावू नका. कारण याचा ताेटा लगेच नसला तरी काही दिवसांनंतर अवश्य दिसेल.
उपाय : या आठवड्यात श्रीगणेशाची कृपा व आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसातून पाच वेळा ‘ ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नाे दन्ति प्रचाेदयात’ या मंत्राचा जप करा.