वृश्चिक

    13-Sep-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
तुम्ही नेहमी भ्रमात जगत असता आणि नेहमी परिस्थितींचे मूल्यांकन आपल्या साेयीनुसारच करीत असता. परिस्थितीनुसार स्वत:ला राखण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही जी तुम्ही विकसित करण्याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा.
 
नाेकरी/व्यवसाय :तुमच्याकडे काम जास्त असाे वा कमी तुम्ही दाेन्ही स्थितींमध्ये तक्रारच करीत असता. इतरांकडे नव्हे तर स्वत:कडे. गाेष्टी त्याच रुपात घ्याव्यात ज्या रुपात त्या समाेर येत असतात. सारेच तुमच्या विराेधात कटकारस्थान करीत नसून काहीजण तुमच्यासाेबतही आहेत..
 
नातीगाेती : तुमचे अपयश वा त्रास तुमच्या नात्यांपासून दूर ठेवा. तुमच्या माणसांना तुमची साथ व सल्ला हवा आहे. त्यांना वेळ द्या. या आठवड्यात घरापासून दूर जाण्याची एखादी याेजना बनवू शकता.
 
आराेग्य : आराेग्यासंबंधित तुमच्या साऱ्या त्रासांचे मूळ कारण तुमचे शरीर आहे.या आठवड्यात याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या याेजना व रणनीती बनवावी. आपले आराेग्य उत्तम करण्यासाठी आपण आपल्या दिनचर्येत बदल करायला हवा. हे तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
 
शुभदिनांक : 13, 14, 18
 
शुभरंग : निळा, पिवळा, नारंगी
 
शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
दक्षता : लहानसहान गाेष्टींना एवढे महत्त्व देऊ नये. की त्या तुमच्यासाठी हानिकारक ठरतील.
 
उपाय :मंगळवारी तुमच्या देवघरात तांत्रिक हनुमान यंत्राची स्थापना करा व राेज या यंत्राची पूजा करा. मंगळवारी एखाद्या मारूतीमंदिरात जाऊन माेहरीच्याे तेलाचा एक व शुद्ध तुपाचा एक असे दाेन दिवे लावा. नंतर तिथे बसून हनुमान चालिसा वाचा.