काळाने आणि नशीबाने तुम्हाला नेहमी साथ दिली आहे, पण कुठे ना कुठे प्रयत्नांच्या कमतरतेमुळे तुमच्या उत्तम याेजनाही पुढे जाऊ शकत नाहीत. या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वांत गरजेचा आहे दृढनिर्धार. ताे आपण टिकवून ठेवायचला आहे. कारण तुमचे यश बऱ्याच प्रमाणात यावरच अवलंबून आहे.
नाेकरी/व्यवसाय : तुमच्या मार्गात अडथळ्यांची कमी नाही पण तुम्ही ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत पुढे जात राहायचे आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाचा पुरस्कारही मिळणार आहे. जर तुम्ही इलेक्ट्राॅनिकच्या व्यवसायात असाल तर या आठवड्यात एखादे माेठे डील करू शकता.
नातीगाेती : हा आठवडा कुटुंबीयांसाेबत उत्तम जाणार आहे. एखाद्या छाेट्या प्रवासाचे नियाेजनही तुम्ही करू शकता. दूरचे नातलग येण्याचीही शक्यता आहे.वडीलधाऱ्यांशी एखाद्या मुद्यावरून वाद हाेण्याची शक्यता आहे. ज्यामुळे घरात मतभेदाची स्थिती राहील.
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला नाजुक हाडांसंबंधित वा नसांसंबधित त्रास हाेऊ शकताे. माेसमी आजारांच्या तावडीत सापडू शकता. पण आठवड्याच्या शेवटी सारे काही नाॅर्मल हाेईल. मधल्या काळात डाेकेदुखीचा त्रास हाेण्याची शक्यता आहे.
शुभदिनांक : 13, 14, 18
शुभरंग : पांढरा, गुलाबी, नारंगी
शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात बिझनेस पार्टनर वा कार्यस्थळावर वरिष्ठांशी बाेलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करावी. विशेषत: आत्मविश्वास अतिेरेकी स्वरूपात व्यक्त हाेणार नाही याची काळजी घ्यावी.
उपाय : शुक्रवारी तांदूळ व दूधापासून बनवलेल्या खीरीचा संध्याकाळी लक्ष्मीमातेला नैवेद्य दाखवावा. तिच्याजवळ पितळी दिवाही लावावा. रात्रीच्या जेवणात कुटुंबासह ती खीर खावी.