सिंह

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 
 
horoscope_1  H
 
 
तुमच्यामध्ये खूप सारे गुण असतील पण तुमच्या एका दाेषामुळे तुमचे सारे काम खराब हाेत जाते. महादेवाच्या कृपेने या आठवड्यात धैर्याबाबत आपण हुशारी दाखवाल आणि यामुळे तुमची बिघडलेली कामे शेवटी सावरली जातील. या आठवड्यात तुमचा फोकस बदलण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : तुम्ही दबावातही काम करणे शिकून घेतले आहे आणि हा गुण तुमच्याकडे सुरुवातीपासून आहे. या आठवड्यात कामाचे प्रेशर थाेडे जास्त असेल. जर धातूसंबंधित व्यवसायात असाल तर या आठवड्यात काेणताही नवा करार करू नये. जर गरज असेल तर आपल्या कार्यस्थळीच करावा.
 
नातीगाेती : तुमची कल्पकता तुम्हाला तुमच्या माणसांपासून दूर नेईल. सारेजण कल्पनेत भराऱ्या मारणारे नसतात हे तुम्ही समजून घ्यायला हवे. तसेच वास्तवात राहण्याचीही. या आठवड्यात तुम्ही हा फरक समजून घ्यायला हवा. अन्यथा तुमच्या नात्यांमध्ये कडवटपणा निर्माण हाेऊ शकताे.
 
आराेग्य : दातांसंबंधित त्रास हा संपूर्ण आठवडा तुम्हाला त्रास देईल. यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामेही राेखली जातील. तसा पूर्वीही असा त्रास तुम्हाला झाला हाेता पण या आठवड्यातील याचे माेठे स्वरूप तुम्हाला विचार करण्यास भाग पाडील.
खाण्या-पिण्यावर कडक नियंत्रण हवे व जड जेवणापासून दूर राहावे
.
शुभदिनांक : 13, 14, 18
 
शुभरंग : काळा, ग्रे, जांभळा
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
 
दक्षता : काेणतेही काम करण्यापूर्वी स्वत:ला दाेनदा विचारा की आपण याेग्य मार्गाने जात आहाेत का?
 
उपाय : गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करून केशराचा किंवा हळदीचा टिळा लावावा.शनिवारी मारूतीमंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचा व प्रसाद गरीबांमध्ये वाटा.शक्य असेल तर मंगळवारी व शनिवारी गरीबांना कपडे इ. दान द्या.