आपले मूल्य आपणच ओळखण्याची गरज

    13-Sep-2021
Total Views |
 
 
 
आपल्यातील चांगले गुण पाहा आणि त्याचा वास्तव जीवनाशी संबंध ठेवा
 

know_1  H x W:  
 
संध्यानंद.काॅम
 
जीवन सरळ नसते. कधी सुख तर कधी दु:ख येत राहते.समस्या सगळ्यांना असतात आणि त्यावर मात करण्यालाच जीवन म्हणतात. काेणाचे बालपण आणि प्राैढपण कसे असेल हे सांगता येत नाही. जन्माला येताना काेणाकडेच काही नसते. भविष्यात वेगवेगळ्या भावना निर्माण हाेत जातात. त्यात प्रेम, करुणा, ईर्षा, राग, द्वेष वगैरेंचा समावेश हाेताे. पण, मानवी जीवन पवित्र असते आणि ते असे ठेवणे आपल्याला श्नय आहे आणि या जगाचा निराेप घेताना काही चांगले काम करून जाणेही अश्नय नाही. आपली सतत काेणी प्रशंसा करावी, आपले काैतुक व्हावे असे सगळ्यांना वाटत असते.पण दुसरे आपल्याबाबत काय विचार करतात यापेक्षा महत्त्वाचे आहे आपण आपल्याबाबत काय विचार करताे हे.
  
आपण आपल्याला किती ओळखताे हे जाणून घेणे त्यासाठी गरजेचे असते. आपण माैल्यवान आहाेत आणि या जगाला काही तरी देऊ शकताे हे मान्य करणे ही त्याची पहिली पायरी. जीवनात सर्वत्र आव्हाने आहेत आणि त्यावर मात करून पुढे जावयाचे आहे. आपली किंमत आपण कशी करावी यासाठी तीन उपाय तज्ज्ञांनी सांगितले आहेत. ते असे :
 
1) याेग्य व्यक्तींच्या सहवासात राहणे जीवनात विविध नातेसंबंधांना आपण सामाेरे जात असताे.कधी नातलग असतात, तर कधी मित्र. काही वेळा त्यात कडवटपणा निर्माण हाेताे आणि ताे दूर करण्याचा मार्ग म्हणजे ते सुधारणे. आपण समाजप्रिय असल्यामुळे निकटवर्तीयांबराेबर राहणे आपण पसंत करताे. पण त्यासाठी वापरायला हवे निवडीचे तत्त्व. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून आपण दुखावले गेलाे असू, तर ती जखम भरून येण्यासाठी याेग्य व्यक्तीच्या सहवासात राहणे.हेच दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे, तर आपल्या आत्मविकासाला मदत करणाऱ्यांबराेबर संबंध प्रस्थापित करणे. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात याची जाणीव करून देणाऱ्यांबराेबर राहिलात, तर तुमचा आत्मविश्वास वाढताे. पण समाेरच्या व्यक्तीचा प्रतिसाद उलट असेल, तर तिच्यापासून दूर राहणे चांगले. अनेक जण स्वत:ला निरुपयाेगी समजत असतात. अशा व्यक्ती सकारात्मक लाेकांच्या सहवासात राहिल्या, तर त्याही आशादायी हाेतात.आपल्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्यांना टाळणे याेग्य ठरेल.
 
2) आपल्या नजरेत आपली किंमत ओळखा आपण कसे आहाेत हे जाणून घेण्यामुळे आत्मिक सशक्तीकरणाला मदत हाेते. तेथे हवेत सकारात्मक विचार. ‘मी याेग्य वागताे आहे,’ ‘एखाद्या व्यक्तीबराेबर संबंधांसाठी मी लायक आहे,’ ‘मी स्वत:वर प्रेम करण्यासाठी याेग्य आहे’ यासारखे विचार तुम्हाला चैतन्यदायी ठेवतात आणि त्यातून आत्मविश्वास वाढताे. पण, केवळ विचार करून भागणार नाही, तर आपणही महत्त्वाचे आहाेत हे मान्य करणे त्यासाठी आवश्यक आहे. तुमची स्वत:बाबतची समजूत आणि वास्तव जीवन यांच्यात समन्वय असेल, तर ते श्नय हाेईल. ताे साधला गेल्यावर तुमचे अंतर्मन त्याचा स्वीकार करेल.
आपण कसे आहाेत हे आपल्याशिवाय दुसरे काेणी जाणू शकत नाही, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे हेही विसरू नका.
 
मानसिकदृष्ट्या खंबीर हाेण्यासाठी ‘आराम काेशा’तून (कम्फर्ट झाेन) बाहेर पडून आव्हानांना सामाेरे जावे लागते. उदा. तुम्हाला स्वत:विषयी बाेलणे जमत नसेल, तर त्यासाठी प्रयत्न करा किंवा हे त्या नाेकरीत समाधानी असाल, तर दुसरा नवा राेजगार शाेधण्याचा प्रयत्न करा. पाऊल उचलल्याशिवाय चालता येत नाही हे तत्त्व लक्षत ठेवा आणि आराम काेशातून बाहेर पडा. पहिले पाऊल डगमगते असले, तरी ते तुमच्यातील आत्मविश्वास जागविते. सुरू केलेले काम पूर्णत्वाला नेण्याची जिद्द म्हणजे आपण आपल्याला मान्यता देणे किंवा स्वीकारणे. आपण आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकताे हा आत्मविश्वास बाळगा.त्यात दीर्घकालीन किंवा तत्कालीक उद्दिष्टे असू शकतात. आपण आपल्याबाबत सतत नकारात्मक विचार करत राहिलाे, तर हाती आलेल्या संधी निसटतात हे लक्षात ठेवा.
 
3) अंतर्मनातील जखमांवर उपचार आपण आहाेत तसे आपल्याला स्वीकारण्याच्या प्रयत्नांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे, भूतकाळात डाेकावणे. त्यातून आपण अंतर्मनातील जखमा भरून काढू शकताे. आपल्याला आलेले कटू अनुभव, मिळालेली वाईट वागणूक, झालेले आघात आणि दडपल्या गेलेल्या इच्छांमुळे आपण स्वत:ला तुच्छ समजायला लागताे. त्यातून प्रगती थांबते. भूतकाळाचा विचार करू नये असे सांगितले जात असले, तरी काही वेळा ताे करावा लागताे. भूतकाळात काय चुका झाल्या याचा विचार वर्तमान आणि भविष्यकाळातील सुधारणांसाठी उपयुक्त ठरताे.