कोणत्याही व्यायामाचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा आपण तो व्यायाम योग्य पद्धतीने करतो. म्हणून जर तुम्ही जॉगिंग करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवा.
- जॉगिंग करण्यासाठी जॉगिंग शूजचा वापर करणं आवश्यक ठरेल, पण शूज खूप घट्ट नकोत. योग्य शूजसह जॉगिंग केलं नाही तर टाचा, कंबर आणि मणक्याच्या हाडाचंही नुकसान होऊ शकतं.
- जॉगिंग करताना तुमच्या पेहरावाकडेही लक्ष द्या. तो जॉगिंगसाठी अनुकूल आणि आरामदायक असावा. सिंथेटिक कपडे घालू नका.
- जेव्हा जॉगिंगला जाल, त्यापूर्वी पोट व्यवस्थित साफ झालेलं असावं. गॅस, अपचन यांचा त्रास नसावा. अशा प्रकारच्या समस्यांमुळे शरीर जड झाल्यासारखं वाटतं. यामुळे जॉगिंगमुळे फायदा न होता तोटाच होतो.
- शक्यतो जॉगिंग रिकाम्या जागेत करा. याचा सकारात्मक परिणाम शरीरावर होतो.
- जॉगिंग फुटपाथ किंवा रस्त्यावर करण्याच्या तुलनेत कच्च्या जमिनीवर करणं उत्तम. प्नकी जमीन कडक असण्यामुळे गुडघ्यांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.